जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
मजूर इसमास लुटणा-या सराईतांना वारजे पोलीसांनी केले जेरबंद
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन:- दिनांक १२/०५/२०२५ रोजी एक मजुर इसम त्याचे काम आटोपून वारजे पुलाखाली बावधन परिसरात असणाया त्याच्या घरी जाण्यासाठी उभा होता. त्यावेळी एक रिक्षा त्याचे शेजारून जाताना त्याचेजवळ थांबली. तेव्हा रिक्षाचालकाने त्यास कोठे जायचे आहे असे विचारले असता त्या मजूराने रिक्षाचालकास बावधन येथे जायचे असल्याबाबत सांगितले.
त्यावर रिक्षाचालकाने आम्ही तिकडेच चाललो आहे, तुला तेथे सोडतो असे म्हणून मजुर इसमास त्यांचे रिक्षामध्ये बसवले. रिक्षाचालकाने रिक्षा वारजे पुलाकडून बावधनकडे जाणाया सर्व्हिस रोडने घेवून जात डुक्करखिंडच्या जवळपास गेल्यावर लघुशंकेच्या बहाण्याने रिक्षा थांबवून खाली उतरला व मजुर इसमाचे शेजारी बसलेल्या इसमास खाली बोलावून घेतले.
त्यानंतर रिक्षाचालकाने नियोजनबध्द पध्दतीने रिक्षामध्ये बसलेल्या मजुरास दोन्ही बाजूने घेरून त्याला धमदाटी करत त्याचे खिशातून २ हजार रुपये आणि एक मोबाईल जबरदस्तीने हिसकावून काढून घेतला.
त्यास पोलीसांत गेलास तर जिवे मारून टाकेन अशी धमकी देवून रिक्षासह तेथून निघून गेले होते. रिक्षाचालकाने व त्याचे साथीदाराने त्यास दिलेल्या धमकीमुळे घाबरून पोलीसांकडे आला नाही.
दुसया दिवशी मजुर इसम त्याचे कामाचे ठिकाणी गेल्यानंतर त्याने सदरचा प्रकार त्याचे ठेकेदार मालकास सांगितल्याने ते तक्रार देण्यासाठी वारजे पोलीस ठाणे येथे आले.
मजूर इसमाचे तक्रारीवरून वारजे माळवाडी पो.स्टे गु.र.नं २०४/२०२५ भा.न्या.सं.कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करून तपासाचे अनुषंगाने तपासकामी दोन वेगवेगळी पथके तयार करून रिक्षाचे वर्णन घेवून शोधकामी रवाना केली होती.
सदर पथकांनी वेगवेगळ्या रिक्षा स्टॉपला सदर रिक्षाचा शोध घेण्यासाठी अनेक रिक्षाचालकांची मदत घेण्यात आली.
परंतू काहीएक उपयुक्त माहिती मिळाली नाही. रिक्षाचा शोध सुरुच असताना काहीवेळाने एका रिक्षाचालकाने पोलीस अंमलदार विजय भुरुक यांना फोनव्दारे सदर वर्णनाची एक रिक्षा वारजे जकात नाक्यावरून कर्वेनगर परिसरात गेली असल्याचे सांगितले.
लागलीच पोलीस अंमलदार विजय भुरुक यांनी मिळालेली माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिली असता मा. वरिष्ठांनी सपोनि रणजित मोहिते, पोलीस अंमलदार धनंजय देशमुख, विजय भुरुक, विक्रम खिलारी व संभाजी दराडे यांचे एक पथक कर्वेनगर परिसरात रवाना केले.
सदर पथकाने नमुद वर्णनाची रिक्षा ताब्यात घेवून त्यातील चालक आदित्य राम वाघमारे, वय- २३ वर्षे, रा. करीश्मा चौक, कोथरूड पुणे याचेकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
परंतू त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे कसून तपास केल्यावर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले व त्याचा साथीदार सत्येंद्र मिठाईलाल जयस्वाल, वय- २० वर्षे, रा. एकता कॉलनी, वारजे पुणे याचे नावही सांगितले. दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेला पुर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ०३, पुणे श्री. संभाजी कदम, मा.सहा. पोलीस आयुक्त,कोथरुड विभाग, श्री. अजय परमार, यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश बडाख यांचे देखरेखीत वारजे चौकीचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रणजित माहिते व पोलीस अंमलदार धनंजय देशमुख, विजय भुरुक, विक्रम खिलारी व संभाजी दराडे यांनी केलेली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख