जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
कोयता गँग टोळीतील मोरख्यावर एम.पी.डी.ए. कायदयान्वये कारवाई, ०१ वर्षासाठी जेलची हवा वाघोली पोलीसांची कारवाई
वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वाघोली पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार ओम दादाराव म्हस्के, वय १९ वर्षे, रा. दुबेनगर लेन नं. १३ गुरुदत्त सोसा. वाघोली ता. हवेली जि. पुणे यास मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबध्द आदेश काढल्याने सदर आरोपीची छञपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे ०१ वर्षासाठी रवानगी करण्यात आली आहे.
वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील दुबेनगर, बी. जी. एस. फाटा व वाघोली बाजारतळ तसेच आसपासच्या भागात कोयत्याचे सहायाने दहशत माजवुन, कायम लोकांना दहशतीखाली ठेवुन त्यांना वारंवार त्रास देणाऱ्या इसमामुळे सदर परिसरातील रहीवाशी दडपणाखाली वावरत होते, सदर आरोपी इसमामुळे वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु लागल्याने सदर इसमावर मा. पोलीस उप आयुक्त, श्री. हिंमत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त सौ. प्राजंली सोनवणे, वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री पंडीत रेजितवाड यांचे निरीक्षक, श्री पंडीत रेजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार, पोलीस अंमलदार सागर कडु, कमलेश शिंदे यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम याचेवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई होणेबाबत मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाईचा आदेश श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी आदेश काढला असुन त्याची बजावणी सदर आरोपी इसमास करण्यात आली आहे. यापुढे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत कोयत्याचे सहायाने किंवा सोशल मिडीयाचा वापर करुन दहशत निर्माण करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेऊन अशा प्रकारच्या कारवाईची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो. श्री. अमितेश कुमार, मा. अप्पर पोलीस आयुक्त साो. श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त सो. श्री. हिंमत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त साो. सौ. प्राजंली सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंडीत रेजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार, परि. पोलीस उपनिरीक्षक दर्शन देवगुडे, म.परि. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत कर्णवर, प्रदिप मोटे पोलीस अंमलदार सागर कड्डू, कमलेश शिंदे, गणेश आव्हाळे, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, प्रतिम वाघ, गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख