जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
जेष्ठ नागरिकांची फसवणुक करणाऱ्या आरोपीस अटक १६ गुन्हे उघड करुन एकुण १३,९०,७००/- रुपयांचा मुदेमाल हस्तगत
विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं ३२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८ (४) अन्वये दाखल गुन्हयात लक्ष्मी रोड, पुणे येथे दिनांक ०२/०२/२०२५ रोजी सायंकाळी ०६.४५ ते ०७.०० वाजताचे सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम, गांजवे चौक, शास्त्रीरोड, नवीपेठ, पुणे याठिकाणी एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीस पैसे काढण्यास मदतीच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड स्वतःकडे घेवुन आरोपीने त्याचेजवळील एटीएम कार्ड त्यांना देवुन दुसऱ्या एटीएम कार्ड मधुन एकुण २२,०००/- रुपये काढुन फिर्यादी यांची फसवणुक केल्याने दाखल गुन्हयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे अधिकारी मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.
दाखल गुन्हयाचे तपासात विश्रामबाग तपास पथकातील अंमलदार मयुर भोसले व आशिष खरात यांनी तांत्रीक विश्वलेषन व गोपणीय खबरीच्या मदतीने सदरचा गुन्हा केलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता सदरच्या आरोपीने त्याचे नांव राजु प्रल्हाद कुलकर्णी वय ५४ वर्षे रा. – १७३ नेताजीनगर भ्रडक्रॉस गणपती मंदीराजवळ, अलानहली, म्हैसुर पिन कोड ५७००२८, राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगीतले. तसेच आरोपीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात वेगवेगळ्या बँकेचे एकुण १६६ एटीएम कार्ड मिळुन आले.
आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपीने पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातचे अंतर्गत जेथे पेन्शनची रक्कम उचलणारे जेष्ठ नागरिक पैसे काढण्यास येतात अशा एटीएम मशीन समोर थांबुन राहायचा व ज्या जेष्ठ नागरिकांना एटीएम मशीन मधुन पैसे काढता येत नाहीत. अशा जेष्ठ नागरिकांस पैसे काढण्यास मदत करण्याचे भासवुन त्यांच्याकडुन एटीएम कार्डचा पिन नंबर व एटीएम कार्ड हातात घेतल्यानंतर हातचालाखीने दुसरे एटीएम कार्ड बदलुन एटीएम कार्ड मशीन मध्ये टाकल्यानंतर सदरचा एटीएम पिन मॅच होत नसल्याचे सांगत असे व बँकेत जावुन चौकशी करा असे सांगुन तेथुन निघुन जावुन दुसऱ्या एटीएम मशीन मध्ये जावुन प्राप्त एटीएम कार्डचा वापर करुन पैसे काढुन घेऊन फसवणुक करत असे. अशा प्रकारे अनेक शहरातील अनेक जेष्ठ नागरिकांची फसवणुक केली असुन आज रोजी पर्यंत २१ जेष्ठ नागरिकांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले असुन त्याबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हयाचे तपासात आरोपी राजु कुलकर्णी यांच्याकडुन एकुण १३,९०,७००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन मिळालेल्या रक्कमेतुन एकुण १६ जेष्ठ नागरिकांची फसवणुक केलेली रक्कम प्राप्त केलेली आहे. आरोपीने शहरात आणखीन गुन्हे केले असण्याची शक्यता असुन नागरिकांना तक्रार देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री संदिपसिह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीमती विजयमाला पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तसेच मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, संतोष शेरखाने, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केलेली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























