जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
विशाल आडसूळ याच्या अपहरण प्रकरणी आणखी दोघांना अटक.
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- कोल्हापूर- भुये येथील विशाल आडसूळ यांच्या अपहरण प्रकरणी वैभव रामचंद्र घाडगे (रा.शाहुनगर, मिणचे सध्या रा. मिरज उस्माने मोहल्ला, मेरी भोरी पब्लिक स्कुल मिरज) संग्राम सतीश धुमाळ (रा. पाण्याच्या टाकीजवळ सांगली नाका, इंचलकरंजी) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.
करवीर तालुक्यातील भुये येथील विशाल मोहन आडसूळ (वय 26) याचे (दि.09 फ़ेब्रु.) रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास भुये येथील कमानी जवळून अनोळखी व्यक्तीनी चार चाकीतुन अपहरण केले होते. याची फिर्याद विशालचे वडील मोहन आडसूळ यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.मिळालेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी सदर गुन्हयांत सात संशयीत आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यातील तिघांना (दि.10 फ़ेब्रु) अटक करून अपहरण झालेला विशाल यांची सुटका करून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित चौघांचा पोलिस शोध घेत असताना या गुन्हयांतील इतर साथीदारांचा शोध पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पोलिस पथकाला या गुन्हयांतील आणखी दोन आरोपी वैभव घाडगे आणि संग्राम धुमाळ हे इंचलकरंजी येथे असल्याची माहिती. या पथकातील पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन साठी रचत घाडगे आणि धुमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील इरटिका कार नं. (MH – 10 – EE – 8795) या कारसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली देऊन हा गुन्हा श्रीकृष्ण महादेव कोकरे यांच्या सांगण्यावरून वैभव घाडगे, संग्राम धुमाळ, निखील विजय कांबळे (रा. मिरज) यांनी (दि. 09 फ़ेब्रु) रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास भुये येथील कमानी पासून इरटिका गाडीतुन विशाल आडसूळ याचे अपहरण करून त्याला सांगली येथील श्रीकृष्ण कोकरे, मारुती पवार आणि त्यांच्या इतर साथीदारांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. सदर आरोपीना कारसह पुढील तपासासाठी करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.उर्वरीत संशयीत आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा. महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस अमोल कोळेकर,रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, अमित मर्दाने,रुपेश माने आणि विनोद कांबळे यांनी केली.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख