जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
पिंपरी : संत तुकाराम नगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, चार जण ताब्यात
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- पिंपरी : चिंचवडमधील संत तुकाराम नगर भागात दोन
गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, गुंडा विरोधी पथकाने चौघांना ताब्यात घेतले आहे.
व्हायरल व्हिडिओत एका गटातील व्यक्ती दुसऱ्याच्या अंगावर धावून जात कानशिलात मारताना दिसत आहे. यानंतर इतरांनी त्या व्यक्तीला जमावाने मारहाण केली. या हाणामारीत एका व्यक्तीच्या पाठीत सिमेंटचा मोठा गट्टू टाकल्याचे दिसत आहे. सजग नागरिकाने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल नसला, तरी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, या हाणामारीचे कारण ऑनलाइन ब्लिंकइट डिलिव्हरीच्या ऑर्डरवरून झालेल्या वादातून उफाळल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख