जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
चैन स्नॅचिंग करणारे सराईत आरोपी जेरबंद वाघोली सह पुणे शहर कडील दोन, पुणे ग्रामीण कडील एक असे गुन्हे उघड करून व नाशिक शहर कडील तीन गुन्हयातील एक पाहिजे आरोपी ताब्यात
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन:- मा पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ४ श्री हिंम्मत जाधव, मा . सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्राजंली सोनवणे व वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन श्री युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली, वाघोली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २१९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास चालू असताना पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे, दिपक कोकरे यांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणच्या आधारे दाखल गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील सराईत आरोपी प्रशांत संतविजय यादव वय १९, राहणार शिवाजीनगर सातपुर नाशिक, तालुका नाशिक जिल्हा. नाशिक याचेकडे तपास केला असता त्याचा मित्र कुणाल विश्वनाथ साबळे वय २१ वर्षे राहणार स्वामी नगर, सिडको, नाशिक याचे साथीने दौंड येथून दुचाकी चोरी करून वाघोली पो स्टे हद्दीत चैन स्नॅचिंग केली. तसेच त्याचा दुसरा मित्र ताजीम सल्ला उददीन अन्सारी वय २०, राहणार सातपुर अशोकनगर, नाशिक, याचे साथीने त्याच चोरीच्या दुचाकीवरून कोरेगाव पार्क व विमाननगर परिसरात चैन स्नॅचिंग करून त्यातील चोरीचा माल त्यांचे पहिला मित्र आहे संजोग संतोष भांगरे वय १८, राहणार सातपुर शिवाजीनगर, नाशिक, विठठल रुक्मिणी मंदीर, नाशिक, व दुसऱ्याचा नाव आहे मनोज उदय पाटील, वय ३१ राहणार सातपुर शिवाजीनगर, स्नेहल रो हाऊस, विठठल रुक्मिणी मंदीरा शेजारीता, नाशिक यांचेकडे दिल्याचे सांगितलेने, खालील गुन्हे उघकीस आले आहेत.
पहिला गुन्हा वाघोली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबरगु २१९/२०२५ बी एन एस कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे दुसरा गुन्हा विमानतळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबरगु २४६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) प्रमाणे तिसरा गुन्हा, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५१ / २०२५ भारतीय ज्ञान संहिता कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे चौथा गुन्हा, दौंड पोलीस स्टेशन (पुणेग्रामीण) गुन्हा रजिस्टर नंबर ३६९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे
तसेच आरोपी ताजीम सल्लाउददीन अन्सारी हा खालील पोलीस स्टेशनकडे पाहिजे आरोपी आहे पाचवा गुन्हा, गंगापूर पोलीस स्टेशन (नाशिक शहर ) गुन्हा रजिस्टर नंबर ११३/२०२५ बी एन एस कलम ३०९(४), ३(५) सहावा गुन्हा, म्हसरूळ पोलीस स्टेशन (नाशिक शहर ) गुन्हा रजिस्टर नंबर १०२ / २०२५ बी एन एस कलम ३०९ (४), ३(५)
सातवा गुन्हा, सातपूर पोलीस स्टेशन (नाशिक शहर ) गुन्हा रजिस्टर नंबर १०१ / २०२५ बी एन एस कलम ३१० (२),३३१,३५२,३५१(२)(३)
यातील आरोपी पहिला, ताजीम सल्लाउददीन अन्सारी, दुसरा आरोपी संजोग संतोष भांगरे, तिसरा आरोपी मनोज उदय पाटील, यांना पूढील कार्यवाही कामी विमानतळ पोलीस स्टेशन कडे देण्यात आले असून आरोपी प्रशांत संतविजय यादव, कुणाल विश्वनाथ साबळे यांना अटक करून त्यांचेकडून सोने, एक दुचाकी, दोन मोबाईल असे १,८९,०००/- रुपये किंमती चा मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास चालू आहे.
सदरची कामगीरी मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री मनोज पाटील, मा पोलीस उप आयुक्त परीमंडळ ४ पुणे शहर, श्री हिम्मत जाधव, मा सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे, श्री युवराज हांडे, तपास पथक अधिकारी पोउपनि मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, रामचंद्र पवार, समीर भोरडे, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, मंगेश जाधव, राजाराम अस्वले, शिवाजी सालके, शिवाजी चव्हाण, प्रितम वाघ यांनी केली

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख