Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी...

उरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी मोहीम.

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

उरुळी कांचन मध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी मोहीम.

उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रकारांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी शनिवारी अनोखी व निषेधात्मक कारवाई हाती घेतली. किरकोळ कारणावरून दुकानदारावर चाकूने वार करणारा स्वप्निल बाळु ओव्होळ (राहणार, तुपे वस्ती, उरुळी कांचन) या आरोपीची गावभर सार्वजनिक धिंड काढून पोलिसांनी स्थानिक गुन्हेगारांना कडक इशारा दिला.

शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या मोठ्या बंदोबस्तात या आरोपीला गावातील मुख्य मार्गाने फिरवण्यात आले. तुपे वस्ती रेल्वे स्टेशन एम जी रोड मार्गे उरुळी कांचन पोलीस स्टेशनपर्यंत ही धिंड काढण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कारवाईबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आणि समाधानाचा सूर दिसून आला.

ही मोहीम २५ नोव्हेंबर रोजी घडलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आली. तुपे वस्ती येथील देवी मंदिरासमोर किरकोळ वादातून स्वप्निल ओव्होळ याने दुकानदार प्रभाकर तुपे (वय ६०) यांच्यावर धारदार चाकूने सलग तीन चार वार पोटाच्या भागात, तसेच हातावर केले. या हल्ल्यात प्रभाकर तुपे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर तपासाच्या धाग्यावरून पोलिसांनी स्वप्निलला अटक केली.

यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात आरोपीला सर्वप्रथम हल्ला घडलेल्या ठिकाणी आणले. तेथे सविस्तर चौकशी सुरू असताना परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी पोलिसांनी आरोपीला विचारले, “इथला दादा कोण?” त्यावर स्वप्निलने ठाम आवाजात उत्तर दिले, “इथला दादा पोलीस!” या एका वाक्यावर उपस्थित नागरिकांनीही समाधान व्यक्त केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या धिंडीसंदर्भात माहिती देताना उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले, “या कारवाईचा उद्देश गुन्हेगारीविरोधात जनजागृती करणे आणि नागरिकांचा कायद्यावरील विश्वास आणखी दृढ करणे हा आहे. शहरातील गुन्हेगारीची विषारी चाहूल ग्रामीण भागात पसरू देणार नाही. माझ्या हद्दीत कुठलेही गैरकृत्य सहन केले जाणार नाही. गुन्हेगार वृत्तीच्या लोकांनी आताच शहाणे व्हावे, हा आमचा स्पष्ट संदेश आहे.”

या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सपोनि ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, अनिल खोमणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पोलीस हवालदार निलेश जाधव, प्रविण चौधर, प्रशांत पवार, संतोष जाधव, प्रदीप बालगुडे, अशिष उल्हाळकर, ऋषिकेश सासकर, राजकुमार भिसे, सुदर्शन माने, अश्वजीत मोहड तसेच महिला पोलीस हवालदार सुजाता भुजबळ, महिला पोलीस शिपाई सुवर्णा गायकवाड यांसह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उरुळी कांचन व आसपासच्या भागात अलीकडे किरकोळ कारणांवरून वाद, मारामाऱ्या आणि हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याची चर्चा नागरिकांत होती. पोलिसांनी केलेल्या या निषेधात्मक धिंडीमुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहेत, असा ठोस संदेश या कारवाईतून लोकांपर्यंत पोहोचला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- लोणी काळभोर, पुणे...

बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू... मार्शल मिडिया न्युज:- पुणे ऑनलाईन:- बारामती : दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री...

खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान प्रतिनिधी:- सातारा ब्युरो चिफ दिलीप वाघमारे मार्शल मीडिया न्यूज:- पुणे...

Vivo X300 Pro पुनरावलोकन: फ्लॅगशिप मोबाइल फोटोग्राफी. पुन्हा परिभाषित.

Vivo X300 Pro हा कॅमेरा उत्साही लोकांसाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे आणि तो टेलीफोटो एक्स्टेंडर किटला देखील सपोर्ट करतो, जो मागील वर्षापर्यंत अल्ट्रा मॉडेलसाठी...

सोमाटणे टोलनाक्यावर हवालदार राठोडच्या शौर्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले, प्रचंड मुद्देमाल जप्त…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ सोमाटणे टोलनाक्यावर हवालदार राठोडच्या शौर्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले, प्रचंड मुद्देमाल जप्त... पिंपरी-चिंचवडमधील सोमाटणे टोल नाक्यावर आज पहाटे सिनेमात शोभेल...

error: Content is protected !!