जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
छेडछाडीला कंटाळून तरुणीचा विष पिवून आत्महत्येचा प्रयत्न
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोंढवा भागात ही घटना घडली असून, तरुणीला त्रास देऊन तिला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण तिचा पाठलाग करुन त्रास देत होता. माझ्याशी विवाह न केल्यास अपहरण करेल, तसेच तुझी छायाचित्रे सोशल मिडीयात प्रसारित करुन बदनामी करेल, अशी धमकी आरोपी तरुणाने दिली होती. आरोपीच्या त्रासामुळे घरी किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना याबाबतची माहिती रुग्णालयाने दिली. नंतर पोलीस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तरुणीचा जबाब नोंदविला. त्यानंतर गुन्हा दाखल केला.
(सहायक निरीक्षक सचिन थोरात तपास करत आहेत..)

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख