जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ चे रखेडलेले काम अखेर पोलिस बंदोबस्तात सुरू; कामाला गती देण्याची मागणी
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- नाशिक दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ चे काम बी आर गोयल या नावाजलेल्या ठेकेदाराला देण्यात आले आहेत, दोन वर्षे उलटूनही अतिशय संत गतीने सुरू असलेल्या कामामुळे होणाऱ्या त्रासाने कसमादेसह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील जनता प्रचंड परेशान आहे, मागिल वर्षी सहा सात महिने पाणी टंचाई मुळे चालु काम खंडीत करण्यात आले होते, महामार्गा लगत असलेल्या जमिन धारक शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला न मिळाल्याने त्यांनी कामाला हरकत घेत काम बंद पाडले होते.
मध्यंतरी देवळा चांदवडचे स्थानिक लोकप्रतिनिधी डॉ राहुल आहेर यांनी मध्यस्थी करून संबंधित ठेकेदार, बाधित शेतकरी यांच्या बैठकाही घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला त्याला काही अंशी यशही आले, रामेश्वर फाटा ते भावडबारी दरम्यान सात ते आठ किमी प्रवासाठी अर्दा ते पाऊण तास लागतो त्यामुळे प्रवाशांसह सर्वच जनता मेटाकुटीला आली आहे, सध्या उपलब्ध लागल्याने प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे, भावडबारी घाटात चार कि मी पर्यंत दोन्ही बाजूंने घाटाच्या रूंदीकरणा साठी घाट कटींग चे काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र घाटा खाली तिन चार किमी पर्यंत जागो जागी शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकती मुळं काम रखडले आहे, शेतकऱ्यांनाही त्यांच्या जमिनीसाठी उचित मोबदला दिला गेला पाहिजे, आणि कामही योग्य प्रकारे सुरू राहीले पाहिजे अशी सर्व सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
गेल्या दोन तीन महिन्यांपासून बंद पाडलेले काम अखेर पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले असल्याने जनतेने समाधान व्यक्त केले आहे, प्रतिक्रिया गेल्या दोन वर्षांपूर्वी वाजा गाजा करत सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ चे काम हे कधी पाणी टंचाई तर कधी स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींना उचीत मोहबदला अदा न केल्याने रस्त्याचं काम रखडले आहे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन काम या पावसाळ्यापूर्वी पुर्ण होणे गरजेचे आहे,
अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिकचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख