जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
माणुसकी जिवंत आहे! एका प्रामाणिक रिक्षाचालकामुळे संपूर्ण कुटुंबाला मिळाला दिलासा…
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- एका हरवलेल्या बॅगेने एका कुटुंबावर संकट आणले, पण एका प्रामाणिक रिक्षाचालकामुळे त्यांचे डोळे अश्रूंनी नव्हे, तर आनंदाने भरून आले!
नेमकी घटना काय घडली…
विशाल सावडेकर, हे स्विगीमध्ये डिलिव्हरी आणि एका रिकव्हरी फर्ममध्ये नोकरी करतात. महिन्याचा पगार हाती आला म्हणून त्यांनी आपल्या दोन लहान मुलांना जेवायला बाहेर नेलं. पण आनंदाचा तो क्षण एका दुःखद परिस्थितीत बदलला!
एका क्षणात सर्व काही संपल्यासारखं वाटलं…
हॉटेलमधून परत आल्यानंतर लक्षात आलं की त्यांची संपूर्ण महिन्याची पगाराची रोकड ₹ २५,००० – ₹३०,०००आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात राहिली आहे
घरात गॅस संपलेला, भाडं थकलेलं, महिन्याचं राशन घ्यायचंय, मुलांची शाळेची फी भरायचीय… आता पुढचा महिना कसा चालणार
त्यांनी ताबडतोब मार्केट यार्ड पोलीस चौकीत तक्रार नोंदवली. पण मनात सतत एकच प्रश्न—पगार परत मिळेल का? की सर्व काही हरवलं.
आणि मग एक चमत्कार झाला
त्या बॅगेचा शोध प्रामाणिक ऑटो रिक्षाचालक श्री. गफ्फुर शहाबुद्दीन शेख यांना लागला.
ते आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संघटक आहेत.
त्यांनी त्वरित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिल
(१)जीबरील शेख (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य)
(२)उमेश बागडे (खजिनदार, महाराष्ट्र राज्य)
(३) समीर अरवाडे (सह-सचिव, महाराष्ट्र राज्य)
संघटनेच्या टीमने विशाल सावडेकर यांना फोन करून दिलासा दिला तुमची बॅग सुरक्षित आहे
हे शक्य आहे यावर आमचा विश्वासच बसत नव्हता
जेव्हा गफ्फुर शेख यांनी मार्केट यार्ड पोलीस चौकीत, पोलिसांच्या उपस्थितीत, विशाल सावडेकर यांना बॅग परत दिली,
तेव्हा विशाल आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
हे शक्य आहे यावर आमचा विश्वासच बसत नव्हता! आम्ही हतबल झालो होतो… पुढचा महिना कसा जाईल या विचाराने झोप उडाली होती. पण या प्रामाणिक माणसांमुळे आमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आला. विशाल सावडेकर
प्रामाणिकतेला सलाम! समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे
गफ्फुर शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांसारखे काही मोजके प्रामाणिक रिक्षाचालक अजूनही आहेत,
ज्यांच्यामुळे रिक्षाचालकांच्या प्रामाणिकतेला आणि समाजातील विश्वासाला नवा आयाम मिळतो.
हाच खरा माणुसकीचा विजय.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख