जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:-९०११६०१८११
सरकार राज गाण्यावर स्टंट करणं ठाणेकरांना पडलं महागात.
सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर बीनू वर्गीस यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांची तात्काळ कारवाई.
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन:- ठाण्यात काही युवकांनी सरकार राज या चित्रपटातील “गोविंदा आला रे” या गाण्यावर स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधितांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे.
या व्हिडीओमध्ये प्रमुख आरोपी, जो काही दिवसांपूर्वी इंदिरा नगर नाका येथे एका महिलेच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामिनावर सुटलेला होता, जेलमधून बाहेर येताच कार चालवित असताना स्टंट करताना दिसतो. यावेळी त्याच्या मागे काही युवक विनाहेल्मेट दुचाकीवरून जाताना दिसतात.
वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना परिमंडळ ५ उपायुक्त प्रशांत कदम यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले. अवघ्या दोन तासांत मुख्य आरोपीला अटक करण्यात आली.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर, बीनू वर्गीस यांनी संबंधित पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी तत्काळ पावले उचलली आणि मुख्य आरोपीस अटक केली.
भारतीय दंड संहिता (IPC), कलम 189 (2), कलम 190, कलम 270, कलम 28, कलम 285, कलम 184, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, कलम 37 (1) (3), कलम 135 असे या आरोप्यांवर गुन्हा दाखल आहे, आदेशांचे उल्लंघन करणारे आरोपींची नावे, शाहिद रहीम शेख, तौसीफ शेख, इरशाद शेख, समीर शेख, सरफराज शेख, साजिद शेख, इरशाद हे सर्व आरोपी अंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी स्टंटसाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची स्विफ्ट कार जप्त केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख