जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
बुलेटच्या असह्य आवाजावर पोलिसांचा कठोर दंडात्मक प्रहार
जप्त करण्यात आलेले सायलेन्सर व गाड्या
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- परिमंडळ ५ पोलीस उपायुक्त श्री. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ४ अधिकारी आणि १५ पोलीस अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने विविध भागात शोधमोहीम राबवून नियमबाह्य सायलेन्सर असलेल्या आणि नंबर प्लेटशिवाय धावणाऱ्या २२ बुलेट गाड्या ताब्यात घेतल्या. यातील मॉडिफाइड सायलेन्सर काढून टाकण्यात आले आणि मूळ सायलेन्सर बसविण्यात आले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करत एकूण रु.२५,०००/- रुपये दंड आकारण्यात आला. तसेच, ज्या गाड्यांवर नंबर प्लेट नव्हत्या, त्यांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडत नंबर प्लेट बसवून घेण्यात आल्या. त्यानंतरच संबंधित गाड्या त्यांच्या मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की भविष्यातही ही कारवाई सातत्याने सुरू राहील. अनधिकृत बदल आणि नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल.
नागरिकांनी अशा त्रासदायक वाहनांविरोधात पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख