जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
मुंबई ठाणे
सराईत रिक्षाचोर गडाआड; १२ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या १८ ऑटो रिक्षा हस्तगत
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाइन:- पनवेल भागातून ऑटो रिक्षा चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. निसार सत्तार खान (वय ३६) असे आरोपीचे नाव असून, त्याने पनवेल, कळंबोली आणि कामोठे भागातून रिक्षा चोरल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १२ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या १८ रिक्षा बुलढाणा येथून हस्तगत केल्या आहेत. आरोपी रिक्षा चालवत असतानाच ऑटो रिक्षा हेरून त्यांची चोरी करीत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
पनवेल व आजूबाजूच्या परिसरामध्ये रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागल्याने या गुह्यांचा शोध घेण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पनवेल शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने
सूचना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास तपास सुरू केला होता. तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाला गस्त घालत असताना गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपीशी साम्य असलेला संशयित व्यक्ती निसार सत्तार खान हा निदर्शनास आला. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला चार किलोमीटरचा पाठलाग
करून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने पनवेल शहर, कळंबोली व कामोठे परिसरातून गेल्या वर्षभरामध्ये १८ ऑटो रिक्षांची चोरी केल्याची कबुली दिली.
चोरलेल्या रिक्षांची बुलढाण्यात विक्री
आरोपी निसार खान याने चोरलेल्या रिक्षा या बुलढाणा जिह्यातील मेहकर तालुका येथे विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी निसारला अटक करून बुलढाणा येथील मेहकर तालुक्यात जाऊन खात्री केली असता, त्या ठिकाणी चोरीच्या रिक्षा आढळून आल्या. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी बुलढाणा येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध गुन्ह्यांतील १८ ऑटो रिक्षा हस्तगत केल्या.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख