जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! मोटर सायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करून ६,६०,०००/- रू. किंमतीच्या ११ मोटर सायकल केल्या हस्तगत
शिरूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शिरूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या काही काळात झालेल्या मोटारसायकल चोरी उघडकीस आणण्याचे दृष्टीने शिरूर पोलीस स्टेशनमधील वेगवेगळी पथके वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं.३९/२०२५ भा.न्या.सं.का.क. ३०३(२) व इतर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटर सायकलींचा शोध घेणे चालु असतानाच पोलीस अंमलदार विजय शिंदे व नितेश थोरात यांना मिळालेल्या गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे इसम नामे संतोष उर्फ शरद गजानन इंगोले रा. पांगरी कुटे, ता.मालेगाव, जि.वाशिम याचा मोटर सायकल चोरीमध्ये
सहभाग असल्याची खात्री झाल्याने सदर आरोपीतास मालेगाव, जि. वाशिम परीसरातुन ताब्यात घेवुन त्याचेकडे कसोशीने चौकशी करून आरोपीकडुन मालेगाव, जि.वाशिम येथुन ९ हिरो कंपनीच्या स्पलेंडर प्लस मोटर सायकल, १ हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटर सायकल, १ होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल अशा एकुण ११ चोरी केलेल्या मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटर सायकलच्या अनुषंगाने १) शिरूर पोलीस स्टेशन १, २) धाड पोलीस स्टेशन, जि. बुलढाणा- १, ३) चाकण पोलीस स्टेशन १, ४) भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन १, ५) लोणीकंद पोलीस स्टेशन १, ६) खडकी पोलीस स्टेशन १, आळंदी पोलीस स्टेशन २, महाळुंगे पोलीस स्टेशन १, दिघी पोलीस स्टेशन १ व इतर एक असे एकुण ११ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ६,६०,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन आरोपीविरोधात १) जळुका पो.स्टे, जि.वाशिम, २) मालेगाव पो.स्टे जि.वाशिम, ३) पातुर पो. स्टे जि. अकोला, ४) जामनेर पो.स्टे जि. जळगाव, ५) लोणार पो. स्टे जि. बुलढाणा, ६) मेहकर पो.स्टे जि. बुलढाणा येथे दुचाकी चोरीसंदर्भातील एकुण सात गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.
सदर गुन्हयांतील आरोपी नामे संतोष उर्फ शरद गजानन इंगोले रा. पांगरी कुटे, ता. मालेगाव, जि.वाशिम यास शिरूर पो.स्टे गु.र.नं ३९/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असुन त्यास दि. ०७/०२/२०२५ रोजी मा. न्यायालयात रिमांडकामी केले असता मा. न्यायालयाने त्यास दि.०९/०२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी आदेशित केली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण श्री. पंकज देशमुख (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक सी पुणे विभाग श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सी, शिरूर उपविभाग श्री. प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री अविनाश शिलिमकर, शिरूर पो.स्टे चे प्रभारी अधिकारी पो.नि.श्री.संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पो.स्टे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विशाल कोथळकर, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड यांनी केलेली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख