जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
ठाणे जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- ठाणे : जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका मृत व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथे पीडितेच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीच्या विरुद्ध पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत कलम ६१ (१) च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला. पण आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. असे असूनही एफआयआरमध्ये आरोपीच्या मृत्यूची वेळ आणि परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला नसल्याचे म्हटले जात आहे.
आरोपी मुंब्रा येथे वास्तव्याला होता. त्याने शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. पुढे त्या मुलीचा फायदा उचलला. जून ते ऑगस्ट २०२४ या दरम्यान आरोपीने पीडितेवर अनेकदा अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देऊन पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद मांडली, अशी माहिती समोर आली आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आरोपीने अल्पवयीन मुलीशी लग्न केले. त्यानंतर मुलगी गरोदर राहिली आणि १४ फेब्रुवारी रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. दरम्यान एफआयआरमध्ये आरोपीचा मृत्यू झाल्याचे उल्लेख न केल्याने गदारोळ माजल्याचे म्हटले जात आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख