जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
शाळेच्या संस्थाचालकाचा सात महिन्यांपासून विद्यार्थिंनीवर अत्याचार; गुन्हा दाखल
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- सातारा : तासगाव शहरातील एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित रजनीकांत भाऊसाहेब देवकुळे (वय ४३) याच्याविरोधात तासगाव पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईने तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल दिली आहे. संशयित देवकुळे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
संशयित देवकुळे हा शहरातील एका खासगी शाळेचा संस्थाचालक आहे. संबंधित तरुणीशी संशयिताची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणीवर अत्याचार केला. संशयित रजनीकांत याने शाळा व घरी गेल्या सात महिन्यांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे.
गेल्या काही दिवसात मुलीला शारीरिक त्रास सुरू झाला. तिच्या आईने पीडित मुलीला डॉक्टरांना दाखवले असता ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पीडित तरुणीच्या आईने संशयित रजनीकांत देवकुळे याच्याविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवकुळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक विनय गोडसे अधिक तपास करीत आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख