Homeअपडेटगावठी पिस्तूल, कोयते, दुचाक्या जप्त; मिरज पोलिसांचा टार्गेट ऑपरेशन...

गावठी पिस्तूल, कोयते, दुचाक्या जप्त; मिरज पोलिसांचा टार्गेट ऑपरेशन…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

गावठी पिस्तूल, कोयते, दुचाक्या जप्त; मिरज पोलिसांचा टार्गेट ऑपरेशन…

मिरज शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरात घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या, आणि घटनास्थळावरून पसार झालेल्या चार आरोपींविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे.

दिनांक १२ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी, दुपारी साधारण एक वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास, मिरज सिव्हील हॉस्पिटल येथे ही घटना घडली. त्या दिवशी खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींना, मिरज शहर पोलिस ठाण्याकडून सरकारी वाहनातून वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते.

याच वेळी, ओपीडी विभागासमोर वंश दिनकर वाली हा तरुण संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांना दिसला. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि लोखंडी कोयता असा घातक शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे, ९१, सन दोन हजार पंचवीस असा दाखल असून, भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम कलम तीन, चार, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणिशे,५१ चे कलम ३७ उपकलम १ व ३ सह कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्या मार्फत करण्यात येत असून, तपासादरम्यान वंश वाली याचे साथीदार अक्षय फोंडे, वैभव आवळे, समर्थ पोतदार आणि समर्थ गायकवाड यांचा देखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पाठविण्यात आलेल्या पथकाने केवळ चार तासांच्या आत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.

अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दिनांक १५ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडीची मंजुरी दिली. या पोलीस कोठडीच्या कालावधीत, कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळावरून पलायन करताना लपवून ठेवलेली चार लोखंडी कोयती, एक लोखंडी कुकरी, तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी एक होंडा डिओ आणि एक बजाज पल्सर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

यापूर्वीच या गुन्ह्यातून गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, एक कोयता तसेच एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक माननीय श्री, संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक माननीय श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी माननीय श्री, प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री, संदीप शिंदे आणि त्यांचे सहकारी पथक यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली आहे.

आगामी निवडणुका आणि कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता, अवैध शस्त्रे बाळगणारे व त्यांची विक्री खरेदी करणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यांतर्फे देण्यात आला आहे.

सदर कारवाई संदर्भात किंवा अवैध शस्त्र व्यवहार, गुन्हेगारी हालचाली याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती असल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

कायदा हातात न घेता, कायदा व सुव्यवस्थेला सहकार्य करणे, ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची कर्तव्य आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुन्हे शाखा युनिट ५ ची धडक कारवाई, पुण्यात पिस्टल विक्री करणारे व खरेदीदार जेरबंद

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  गुन्हे शाखा युनिट ५ ची धडक कारवाई, पुण्यात पिस्टल विक्री करणारे व खरेदीदार जेरबंद आपण पाहत आहात क्राईम न्यूज...   मार्शल...

निवडणूक मतमोजणीवेळी शांतता भंग, १९ बुलेटसह दुचाकी जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  निवडणूक मतमोजणीवेळी शांतता भंग, १९ बुलेटसह दुचाकी जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- मतमोजणीदरम्यान ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट...

पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे शहरात वाहतूक बदल, काही रस्ते बंद

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे शहरात वाहतूक बदल, काही रस्ते बंद   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- पुणे शहरातील नागरिकांसाठी...

ऑनलाईन फसवणूक आणि रस्त्यावर दहशत, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  ऑनलाईन फसवणूक आणि रस्त्यावर दहशत, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा आपण पाहत आहात क्राईम न्यूज... मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- दिनांक,...

रांजणगावात पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; २०३ किलो गांजा मिश्रित “बंटा” गोळ्या जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  रांजणगावात पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; २०३ किलो गांजा मिश्रित “बंटा” गोळ्या जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:-...

error: Content is protected !!