Homeक्राईमपिस्टल व तीन जिवंत काडतुस जवळ बाळगणा-या आरोपीस केले जेरबंद

पिस्टल व तीन जिवंत काडतुस जवळ बाळगणा-या आरोपीस केले जेरबंद

जाहिराती व बातमीसाठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

पिस्टल व तीन जिवंत काडतुस
जवळ बाळगणा-या आरोपीस केले जेरबंद

सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :-
दि.०३/०२/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस
स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस
अधिकारी व पोलीस अंमलदार असे वरिष्ठांचे आदेशान्वये स.नगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हयांना प्रतिबंध घालणेचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत बालाजीनगर येथील तुळजाभवानी मंदीराजवळ आले असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक इसम पवार हॉस्पीटल पाठीमागील बजरंग दल चौकाजवळील अर्धवट बांधकाम चालु असलेल्या बिल्डींगचे बाहेरील रोडवर बालाजीनगर पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत थांबला असुन त्याचे कंबरेला पिस्टल सारखे हत्यार लावलेले दिसत आहे.

अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड यांना कळविली असता त्यांनी तपास पथकाचे सपोनि सागर पाटील व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले.

त्यानुसार लागलीच सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपी नामे ऋतीक संजय ननावरे वय २४ वर्षे धंदा काही नाही रा. विजयश्री अपार्टमेंट ए/२ विंग चौथा मजला फ्लॅट नं. १९ पवार हॉस्पीटलमागे बालाजीनगर पुणे यास ताब्यात घेवुन त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे पॅन्टमध्ये खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदरचे ६३,०००/-रु कि.चे एक गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस पंचासमक्ष जप्त करुन त्याचेविरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३८/२०२५ आर्म अॅक्ट क ३(२५) व महा. पो. अधि. क ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार महेश मंडलीक, अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत, खंडु शिंदे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.17507771758.36BF86A6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750768253.1E72729 Source link

वनप्लस नॉर्ड 5 कॅमेरा तपशील 8 जुलैच्या प्रक्षेपणपूर्वी उघडकीस आला; 55 डीबी एएनसी पर्यंत...

वनप्लस नॉर्ड 5 8 जुलै रोजी वनप्लस नॉर्ड सीई 5 च्या सोबत भारतात लॉन्च होणार आहे. दरम्यान, वनप्लस कळ्या 4 टीडब्ल्यूएस इयरफोन देखील त्याच...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750762632.C70ABA4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750756038.9b08ea Source link

error: Content is protected !!