Homeक्राईममॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे दुचाकीवरुन येवुन मंगळसुत्र हिसकावणारा गुन्हेगार १२ तासात सहकारनगर...

मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे दुचाकीवरुन येवुन मंगळसुत्र हिसकावणारा गुन्हेगार १२ तासात सहकारनगर पोलीसां कडुन जेरबंद.

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे
दुचाकीवरुन येवुन मंगळसुत्र हिसकावणारा गुन्हेगार १२ तासात सहकारनगर पोलीसां कडुन जेरबंद

२,५०,०००/- किंमतीचे दोन तोळे सोने व एक दुचाकी गाडी जप्त करून चैन चोरीचा गुन्हा उघड

मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाईन:- दिनांक १६/०५/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वाजताचे सुमारास फिर्यादी हिलटॉप सोसायटी, सिध्दीविनायक मंदिरा जवळ धनकवडी पुणे येथे सार्वजनीक रोडवर फिर्यादी महिला मॉर्निंग वॉक करीत असताना. एका दुचाकी गाडीवरून एक अनोळखी इसमाने त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले त्या बाबत अनोळखी चोरटया इसमाविरूध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १९०/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४,३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार असे करीत असताना सदर घटनेच्या अनुषंगाने सुमारे एकशे पन्नास
सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावरुन गुन्हा केलेला आरोपी हा स्विगी कंपनीचा डिलवरी वॉय म्हणनु फिरत असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर, योगेश ढोले यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारा इसम हा गणेश चौक, आंबेगाव पठार, पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत असुन त्याने अंगामध्ये काळे पिवळे रंगाचा हाफ बाहीचा टी शर्ट व निळे रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे. सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन पाहता बातमीतील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असलेला दिसला. त्यास संशय येताच तो तेथुन पळुन जावु लागल्याने त्यांना सोबतचे स्टाफचे मदतीने थोडयाच अंतरावर पकडुन ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अमोल किसन नाकते वय २७ वर्षे सध्या राहणार समता कॉलनी, प्रेरणा शाळेमागे, गणेश चौकाजवळ आंबेगाव पठार पुणे मुळ राहणार पिंपरी पोस्ट गुंजवणे तालुका वेल्हा जिल्हा पुणे असे असल्याचे सांगीतले.

त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता मी सकाळी दुचाकी गाडीवरून आंबेगाव पठार धनकवडी भागात स्विगीचे डिलवरी बॉय म्हणनु फिरण्याचा बहाणा करीत असताना एक वयस्कर महिला रस्त्याने चालत होती त्या महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरी करून मी तेथुन पळुन गेलो असे सांगितले. सदर गुन्हाची कबुली दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर
१९०/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४,३०९ (६) हा गुन्हा उघडकीस आला असुन सदर आरोपी कडुन एकुण ९०,०००/- रूपये किंमतीचे २ तोळे सोने व गुन्हा करतेवेळी वापर केलेली एक दुचाकी गाडी किमंत रुपय ६०,०००/- रुपये व सदर सोने गहाण ठेवुन मिळालेली रक्कम १,००,०००/- रुपये असा एकुण २,५०,०००/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

न्यायालयाने सदर आरोपीस दिनांक २०/०५/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली असुन अधिक तपास सहकारनगर पोलीस ठाणेकडील सपोनि सागर पाटील हे करीत आहेत.

सदरची कामगीरी मा अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री मनोज पाटील. पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती स्मार्तना पाटील. सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील. सहायक पोउपनिरी बापु खुटवड. पोलीस अंमलदार सागर सुतकर. योगेश ढोले. प्रदिप रेणुसे. महेश भगत बजरंग पवार. आकाश किर्तीकर. खंडु शिंदे. अमित पदमाळे, मारोती नलवाड यांनी केली आहे.

आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750836379.3316523 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611D1002.1750830846.299BCDA Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750830087.39F2C350 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1750829597.e172c99 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750828565.E118539 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750836379.3316523 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611D1002.1750830846.299BCDA Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750830087.39F2C350 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1750829597.e172c99 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750828565.E118539 Source link
error: Content is protected !!