Homeक्राईमरांजणगाव एमआयडीसी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. चाकूचा धाक दाखवून कंपनीत जाणाऱ्या कामगारांना लुटणाऱ्या...

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. चाकूचा धाक दाखवून कंपनीत जाणाऱ्या कामगारांना लुटणाऱ्या दोघांना, अवघ्या ४८ तासांत अटक.

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.
चाकूचा धाक दाखवून कंपनीत जाणाऱ्या कामगारांना लुटणाऱ्या दोघांना, अवघ्या ४८ तासांत अटक.

दिनांक ७ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी, सायंकाळी साधारण सातच्या सुमारास, खेमसिंग पुरुषोत्तमसिंग सर्राटे, राहणार ढोकसांगवी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, मूळ गाव भेडवाटोला, तहसील कोतमा, जिल्हा अनुपपूर, मध्यप्रदेश, हे आपल्या मित्रासोबत कंपनीत कामानिमित्त पायी जात होते.

दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी परिसरात, अज्ञात दोन आरोपी त्यांच्याजवळ आले, त्यांना शिवीगाळ केली, दमदाटी केली
आणि चाकू गळ्याला लावून, त्यांच्याकडील आठ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने, चाकूचा धाक दाखवून लुटून नेले.

या घटनेबाबत खेमसिंग सर्राटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे, पोलीस शिपाई उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी, तसेच तांत्रिक विश्लेषण करून,
हे गुन्हेगार कोण आहेत याचा पाठपुरावा सुरू केला.

तपासातून आरोपी क्रमांक एक सौरभ बाळकृष्ण शेलार, वय २५ वर्षे, राहणार, कारेगाव, तालुका, शिरूर, जिल्हा पुणे,
मूळ राहणार, पवननगर, झापवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक

आणि आरोपी क्रमांक दोन मनिष भास्कर काळबांडे, वय २३ वर्षे, राहणार, कारेगाव, फलके मळा, तुकाराम फलके यांचे खोलीत, तालुका शिरूर, जिल्हा, पुणे, मूळ राहणार, ढाबा, तालुका वडनेरा, जिल्हा, अमरावती यांची ओळख पटली.

दोन्ही आरोपींना, ११ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिताफीने अटक करण्यात आली.

कौशल्यपूर्ण तपासात, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या कडून जबरीने चोरी केलेले एकूण साठ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
तसेच गुन्हा करताना वापरलेला चाकूही पोलिसांनी हस्तगत केला.

या आरोपींकडून रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील आणखी दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही संपूर्ण कामगिरी झाली आहे. माननीय पोलिस अधीक्षक श्री, संदीपसिंह गिल सर, अप्पर पोलिस अधीक्षक, पुणे विभाग, माननीय, श्री, रमेश चोपडे सर, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर विभाग, मा. श्री. प्रशांत ढोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली.

या कारवाईत पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कर्मचारी उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर आणि पोलीस हवालदार विजय सरजे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे
आणि पोलीस हवालदार विजय सरजे यांच्याकडे सुरू आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची ही जलद आणि प्रभावी कामगिरी, कामगार वर्गात आणि परिसरातील नागरिकांत, कायद्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- लोणी काळभोर, पुणे...

बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू... मार्शल मिडिया न्युज:- पुणे ऑनलाईन:- बारामती : दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री...

खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान प्रतिनिधी:- सातारा ब्युरो चिफ दिलीप वाघमारे मार्शल मीडिया न्यूज:- पुणे...

Vivo X300 Pro पुनरावलोकन: फ्लॅगशिप मोबाइल फोटोग्राफी. पुन्हा परिभाषित.

Vivo X300 Pro हा कॅमेरा उत्साही लोकांसाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे आणि तो टेलीफोटो एक्स्टेंडर किटला देखील सपोर्ट करतो, जो मागील वर्षापर्यंत अल्ट्रा मॉडेलसाठी...

उरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी...

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ उरुळी कांचन मध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी मोहीम. उरुळी कांचन :...

error: Content is protected !!