जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
सोमाटणे टोलनाक्यावर हवालदार राठोडच्या शौर्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले, प्रचंड मुद्देमाल जप्त…
पिंपरी-चिंचवडमधील सोमाटणे टोल नाक्यावर आज पहाटे सिनेमात शोभेल अशी पोलीस कारवाई पाहायला मिळाली.
चोरीच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या तिघांना पकडण्यासाठी क्राइम ब्रांचने खास सापळा रचला होता. संशयितांची कार टोल नाक्यावर थांबताच पोलिसांनी वेढा घातला. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी पिस्तूल काढत थेट गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.
याच क्षणी हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी अतुलनीय धैर्य दाखवत आरोपीच्या हातातील पिस्तूल चक्क हिसकावून घेतले आणि संपूर्ण पथकाचा जीव वाचवला. त्यांच्या या शौर्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून थोडक्यात वाचली.
या कारवाईत पोलिसांनी सनी सिंह दुधानी आणि जल सिंह दुधानी, दोघेही हडपसर येथील, तसेच मध्य प्रदेशातील मनीष कुशवाह या तिघांना जेरबंद केले. सनीवर तब्बल ७० तर जल सिंहवर ५० गुन्ह्यांची नोंद आहे.
पोलीसांनी दोन पिस्तूल, सात जिवंत काडतूसं, चोरीचे दागिने आणि जवळपास ८ लाख ८७ हजार रुपयांचे शस्त्र आणि हत्यारसाहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
डीसीपी शिवाजी पवार यांनी सांगितलं, की हे तिघे एका मोठ्या टोळीचे सदस्य असून त्यांच्या अटकेमुळे आणखी अनेक गुन्ह्यांचा तपास लागण्याची दाट शक्यता आहे.
या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























