जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाइन:- महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर काही महिन्यातच कारागृहातून जामीन मिळवत बाहेर पडल्यानंतर पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व जीवंत काडतूस जप्त केले असून, ही कारवाई लोणी काळभोर परिसरात करण्यात आली आहे.
अनिकेत गुलाब यादव (वय २२, रा. सोपाननगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे यांनी ही कारवाई केली.
यादव याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. त्यानंतर यादव येरवडा कारागृहात होता. न्यायालयाकडून त्याने जामीन मिळविला. नुकताच तो कारागृहातून बाहेर पडला. दरम्यान, यादव याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस कर्मचारी बाळासाहेब सकटे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख