Homeक्राईमहुंड्याच्या जाचातून विवाहितेची आत्महत्या; पती व सासू अटकेत

हुंड्याच्या जाचातून विवाहितेची आत्महत्या; पती व सासू अटकेत

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

हुंड्याच्या जाचातून विवाहितेची आत्महत्या; पती व सासू अटकेत

मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत हुंड्याच्या कारणावरून जाचहाट केल्याने एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी तात्काळ कारवाई करत मृत महिलेच्या पती व सासूला अटक केली आहे.

उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास, सोरतापवाडी, कडवस्ती, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे राहणाऱ्या दीप्ती रोहन चौधरी, वय ३० वर्ष, यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली.

मृत महिलेच्या आई, सौ. हेमलता बाळासाहेब मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दीप्ती यांना सासरकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. तसेच वारंवार माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकला जात असल्याने त्या त्रस्त झाल्या होत्या, असा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

या प्रकरणी पती रोहन कारभारी चौधरी, दीर रोहित कारभारी चौधरी, सासरा कारभारी चौधरी आणि सासू सुनिता कारभारी चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सासू सुनिता चौधरी या सोरतापवाडी गावाच्या विद्यमान सरपंच आहेत.

पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक भौतिक पुरावे तसेच फोटो व व्हिडिओग्राफी जप्त केली आहे. आरोपी पती रोहन चौधरी यांना २६ जानेवारी रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली असून, सासू सुनिता चौधरी यांना त्याच दिवशी दुपारी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके कार्यरत असून, तपास कायदेशीर चौकटीत गंभीरपणे सुरू आहे. सध्या परिसरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत धक्कादायक घटना: आईकडून मुलाची हत्या, मुलीवरही प्राणघातक हल्ला

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  वाघोलीत धक्कादायक घटना: आईकडून मुलाची हत्या, मुलीवरही प्राणघातक हल्ला   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून...

गोपनीय माहितीनंतर पोलिसांचा छापा; बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  गोपनीय माहितीनंतर पोलिसांचा छापा; बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात अनाधिकृतपणे...

खेडमधील मोठ्या घरफोडीचा उलगडा; आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या जेरबंद

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  खेडमधील मोठ्या घरफोडीचा उलगडा; आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या जेरबंद   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- खेड शहरात भरवस्तीमध्ये घडलेल्या मोठ्या...

एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड; सराईत आरोपी अटकेत

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड; सराईत आरोपी अटकेत   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील काळखैरेवाडी गावाच्या...

शिरूरमध्ये ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; १०.७०७ किलो मेफेड्रोनसह वाहने जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ शिरूरमध्ये ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; १०.७०७ किलो मेफेड्रोनसह वाहने जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- शिरूर शहरातील गॅरेज चालकाच्या...

error: Content is protected !!