जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०१६०१८११
महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या कंपाउंडरला पोलिसांनी केले जेरबंद.
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाईन:- पिंपरी : किराणा दुकानातील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या कंपाउडरला पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे.
२० किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून सहा तासात त्याला शिताफिने जेरबंद केले आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी केली आहे. यशवंत दिगंबर सूर्यवंशी (३२, राहणार. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.याप्रकरणी ६५ वर्षीय महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार,
फिर्यादी महिलेचे चाकण येथे किराणा दुकान आहे. फिर्यादी महिला ३ जून रोजी सकाळी साडेआठच्या
सुमारास दुकानात एकटी असताना संशयित दुकानामध्ये आला. चाकलेट आणि बडीशेप खरेदी करण्याचा त्याने
बहाणा केला. महिलेच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन
त्याने महिलेच्या गळ्यातील ५७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावले. त्यानंतर दुचाकीवरून तो
चाकणच्या दिशेने पसार झाला. याप्रकरणी चाकण पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या
पथकाकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला. पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील
सीसीटीव्ही फुटेजवरून संशयिताचा माग काढला. त्यासाठी २० किलोमीटर अंतरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. खेड तालुक्यातील बोरदरा गावाच्या हद्दीतील एका खासगी कंपनीजवळ संशयिताची दुचाकी आढळून आली.
दुचाकीला मागची नंबरप्लेट नव्हती. तसेच पुढच्या नंबरप्लेटवर चिखल लावला होता. त्यामुळे दुचाकीचा नंबर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत नव्हता. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून दुचाकीमालकाचा शोध घेतला असता एका रुग्णालयाशी संबंधित डाक्टरचे नाव पुढे आले. डाक्टरकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करणारा कर्मचारी संबंधित दुचाकी वापरत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित कर्मचारी खासगी कंपनीमध्ये गेला असल्याचेही डाक्टरांनी सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी खासगी कंपनीतून संशयित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. एक लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्तसंशयिताकडून दुचाकी व २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एक लाख ८० हजार रुपये किमीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सहा तासात या गुन्ह्याची उकल केल्याने युनिट तीनच्या पोलिसांचे कौतुक होत आहे.
सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक सुनील जावळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख