जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
नाशिकमध्ये कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंप लुटला
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- नाशिक-पुणे महामार्गावर टाटा डीईएफ पंपावर चौघांनी तलवा, कोयता आणि दांड्यासह हल्ला करत पेट्रोल पंप लुटला आहे.
रात्रीच्या वेळी चार दरोडेखोर कॅप व जर्किन घालून आले आणि पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्यांनी धमकावत ४० हजारांची रोकड लुटली. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेली रोकड त्यांना काढून दिली.
या अज्ञात आरोपींचा शोध सध्या सुरु आहे. त्यांच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर सुरक्षेचा मोठा सवाल आता उपस्थित राहिला आहे. सतत घडणाऱ्या या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख