जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
मुंबई मध्ये देशी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन आरोपी जेरबंद, गुन्हे शाखा – ४ ची कारवाई
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- मुंबई – येथील सायन कोळीवाडा परिसरात बेकायदेशीररीत्या पिस्टल आणि जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. वडाळा बस डेपो परिसरात ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. जिशान जमील अहमद (१९, रा. पिलीभीत, उत्तर प्रदेश) – याच्या ताब्यातून दोन देशी बनावटीच्या पिस्टलसह मॅगझिन जप्त तसेच दिनेश कुमार महेंद्र पाल (२०, रा. पिलीभीत, उत्तर प्रदेश ) – याच्याकडून एक देशी पिस्टल,मॅगझिन व ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
सदर कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकत आरोपींना रंगेहाथ पकडले. पोलीस हवालदार किशोर महाजन यांनी फिर्याद दिल्यानंतर वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स.पो.नि. अजय बिराजदार हे या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख