जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
रमजान पूर्व बैठक घेतलेबाबत…
आज दि. 27/02/25 रोजी स 11/30 वा. ते 13.00 वा दरम्यान सिटी लॉन्स पारगेनगर कोंढवा या ठिकाणी आगामी रमजान महिना व त्यादरम्यान येणाऱ्या सण उत्सवांच्या अनुषंगाने वानवडी विभागातील कोंढवा, बिबवेवाडी, काळे पडळ भागातील मुस्लिम बांधवांची व इतर शासकीय विभागांचे प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये कोंढवा, बिबवेवाडी, काळे पडळ मधील मस्जिदचे मौलना ट्रस्टी, सदस्य यांच्याकडून अडीअडचणी समजून घेऊन त्यावर उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आम्ही स्वतः उपस्थितांना सण उत्सवाच्या काळात राज्य शासनाने दिलेले आदेशान्वये भोंगे, डीजे, लेझर लाईट, सोशल मीडियावरील आक्षेपार्य पोस्ट, अफवा पसरवणारे मेसेज व रमजान काळात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले.
सदर बैठकीकरिता आम्ही स्वतः व सोबत धन्यकुमार गोडसे (एसीपी वानवडी) वपोनि विनय पाटणकर ( कोंढवा) वपोनि, साळुंखे (बिबवेवाडी), वपोनि पाटील (काळे पडळ) पोनि शेख ( कोंढवा ) पोनि कुमार घाडगे (कोंढवा वाहतूक ), सहाय्यक आयुक्त, वानवडी रामटेकडी श्री.अमोल पवार आरोग्य विभाग श्री. सुनील गुळवे व श्री.राहत कोकणे, PMC MESB कनिष्ठ अभियंता श्री. रजत राठोड, व श्री. अवसरे कोंढवा, अतिक्रमण विभाग श्री. नारायण साबळे अतिक्रमण निरीक्षक हडपसर वानवडी परिसरातील मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, सदस्य 150 ते 200 उपस्थित होते.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख