जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
मार्केट यार्ड पोलीस स्टेशन
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाइन पुणे. दावल एंटरप्राइजेस या दुकानांमध्ये बेकायदेशीरपणे आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर ४ येथे अवैधरीत्या व बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्याला घेतले ताब्यात
आज रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर ४ येथे अवैधरीत्या व बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून मिळतो. अशी बातमी मिळताच आम्ही स्वतः व आमच्या पोलीस स्टेशन अधिकारी अंमलदार व दोन पंचासह आंबेडकर नगर येथे गेलो असता गल्ली नंबर ४ येथील दावल एंटरप्राइजेस या दुकानांमध्ये बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडर मध्ये निष्काळजी पणे,गॅस रिफिलिंग करून देण्याचे काम बेकायदेशीर पणे चालू होते. सदर ठिकाणची अधिक पाहणी केली असता त्या ठिकाणी गॅस रिफिलिंग साठी लागणारे सर्व सामान आम्हास मिळून आले. सदर कार्यवाहीचा पंचा समक्ष पंचनामा करण्यात आलेला असून BNS कलम २८७,२८८ सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 1955 कलम ३ व ७ अन्वये गु. रजि.नंबर २० / २५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपीत बंदी नवाज उर्फ सलीम गुलाब शेरीकर वय ३५ राहणार आंबेडकर गल्ली नंबर ४ दावल मिनी स्टोअर मार्केट यार्ड पुणे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
(मनिषा पाटील)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























