जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
आचा-या सोबतच्या किरकोळ वादातून खराबवाडी येथील हॉटेलच्या किचन मधील हेल्परचा खुन
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाइन पुणे :- दिनांक ०७/०२/२०२५ रोजी ११:३० वा चे सुमारास मौजे रोजी खराबवाडी ता – खेड जि – पुणे येथील सारा सिटी सोसायटीचे इमारत क्रमांक बी / १० याचे नजिक असणारे हॉटेल ऐश्वर्या गार्डनॅ ॲन्ड बार मधील अचारी सुनिल उर्फ उदय प्रकाश गिरी वय ३५ वर्ष, मुळ राहणार – जमगई, पोस्ट मुडीलादेह, देवरीखुर्द, जि सोनभद्र उत्तरप्रदेश याने हेल्पर विजय विनाकय पांचाळे, वय ३५ वर्ष, मुळ राहणार वार्ड क्र २, आष्टागाव, पोस्ट अंबाडा, मोर्शी ग्रामीण, अमरावती याचे सोबत झालेल्या कामाच्या किरकोळ वादातून भाजी कापण्याच्या चाकुने विजय पांचाळे याचे गळयाजवळ वार करुन त्याचा खुन केला आहे.
खुन केल्यानंतर आरोपी सुनिल उर्फ उदय प्रकाश गिरी यानेच खुनाची माहिती हॉटेल मधील वेटर राघवेंद्र उदयभान कुर्मी यास समक्ष सांगितली. तेव्हा लागलीच हॉटेल मधील इतर वेटर व मॅनेजर यांनी आरोपी सुनिल उर्फ उदय प्रकाश गिरी यास ताब्यात घेवुन गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस अंमलदार यांचेकडे सुपुर्त केले. महाळुंगे एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन तपास कार्यवाहीला सुरुवात केली. वेटर राघवेंद्र उदयभान कुर्मी याची फिर्याद नोंदवुन गुन्हा रजि. नंबर ८९ / २०२५ भारतीय न्याय संहिताचे कलम १०३ अन्वये दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासामध्ये आरोपी सुनिल उर्फ उदय प्रकाश गिरी याने गुन्हयाची कबुली दिली असुन त्यास दि ०७/०२ / २०२५ रोजी १४:०० वा ताब्यात घेवुन अटक केली आहे.
अटक आरोपीचे नाव :-
सुनिल उर्फ उदय प्रकाश गिरी वय ३५ वर्ष, मुळ राहणार-जमगई, पोस्ट मुडीलादेह, देवरीखुर्द, जि सोनभद्र, यु.पी.
मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ डॉ. शिवाजी पवार, चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री राजेंद्रसिंह गौर, महाळुंगे एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्याचे श्री नितीन गिते यांचे सुचना व मार्गदर्शन नुसार सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री प्रविण कांबळे हे करत आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख