जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
लोणी कालभोर पोलीस स्टेशन हदीतील अवैध दारू भट्टीवर युनिट ६ गुन्हे शाखा केली कारवाई
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- दिनांक. १८/०२/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, स.पो.नि.मदन कांबळे स्टाफ असेकोंबिंग ऑपरेशन करत असताना स.पो.नि. मदन कांबळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळालीकी,ओढयाचे बाजूला रामदरा रोड येथील मोकळा रोड परिसरात इसम नामे मुकेश कर्णावत हाहातभट्टीची गावठी दारू तयार करत असले बाबत माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुशंगानेलोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव व स्टाफसह शोध घेतला असता खालील नमुद मुददेमाल मिळुन आला असुन इसम नामे मुकेश कर्णावत अंधाराचा फायदा घेवुन जंगलात पळून गेला. सदर ठिकाणी १५०० लिटर तयार दारू १०० रु प्रति लिटर प्रमाणे एकूण १५०,०००/- रू. ची तसेच २०,००० लिटर रसायन५० र्पये प्रति लिटर प्रमाणे असे एकूण १०,००,०००/-रू. चे तसेच सदर ठिकाणी दारू करण्याचेसाहित्य मोटार,ड्रम, एअर ब्लोअर, सरपण व इतर साहित्य असे एकुण ११,६०,०००/- रू.चा मालमिळून आला असून सदर बाबत कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात अला आहे.
सदर आरोपीता विरद्ध लोणी काळभोर पो.स्टे.गु.र.नं. ९८/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदाकलम ६५ (फ) (क) (ई) आन्वये गुन्हा दाखल करून प्रढील तपास कामी लोणीकाळभोर पो. स्टे. यांचेकडुन करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, लोणी काळभोर पो.स्टे. कडीलवरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव, गुन्हे शाखा युनिट ६कड़ील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलास अमंलदार बाळासाहेब सकटे, कानिफनाथकारखेले,सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे तसेच लोणीकाळभोरपोलीस स्टेशन कडील पोलास अमंलदार सातपुते, वनवे, वीर, योगेश पाटील, शिरगिरे यांनी केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख