Homeक्राईमलोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- लोणी काळभोर, पुणे : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, ५ लाख ४३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथकाची नियुक्ती करून प्रभावी मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, दिनांक ०८ डिसेंबर २०२५, रोजी रात्री अंदाजे २० वाजता, सहायक पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे आणि त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत असतानाच, मौजे लोणी काळभोर येथील गुरुकृपा निवास, माळी मळा येथे छतावरील पत्र्याच्या शेडमध्ये पैशांवर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पथकाने तत्काळ सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले, तसेच जुगाराचे साहित्य, खेळातील रोख रक्कम, त्यांच्याकडील मोबाईल हॅन्डसेट आणि जुगार अड्ड्यावर येण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाच दुचाकी वाहनांसह सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. केवळ रोख रकमेची किंमत २५ हजार ६६० रुपये इतकी असून, एकूण जप्त मुद्देमालाची रक्कम ५ लाख ४३ हजार १० रुपये इतकी आहे. याची जप्ती पंचनामा पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे यांनी केला.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे पुढीलप्रमाणे
सचिन सोपान सकट, विशाल हंसराज गुप्ता, मंगेश पुंडलीक शिंदे, गणेश लक्ष्मण सानप, योगेश कैलास चौधरी, अर्जुन पन्नालाल येरवल, अहमद शब्बीर मोगल, विवेक मधुकर काळभोर, शब्बीर हाजीमियाँ शेख, अल्फाज अलीम शेख आणि सयाजी वामन पवार सर्व राहणार. लोणी काळभोर, तालुका. हवेली, जिल्हा. पुणे.

तसेच, अवैध धंदा चालक कानीफनाथ जगदाळे आणि ज्या गुरुकृपा निवास येथे जुगार सुरु होता त्या घराचे घरमालक अरुण सोपान काळे यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर. ५५५/२०२५, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४(५) नुसार अपराध नोंदवला आहे.

पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी हद्दीत अवैध धंद्यांवर १०३ अवैध दारू कारवाया, १४ अवैध गांजा विक्री कारवाया, ३६ अवैध जुगार कारवाया व अवैध गुटखा वाहतूक व साठा यावर १ कारवाई अशा मिळून १५४ प्रभावी कारवाया केल्या आहेत. दोन अवैध मटका चालकांवर एम.पी.डी.ए. कारवाई, तर एक जुगार चालकास तसेच एक महिला अवैध दारू विक्रेत्यास तडीपार करण्यात आले आहे.

अवैध धंद्यांविरुद्ध कारवाया पुढेही अधिक जोमाने सुरू राहतील आणि लोणी काळभोर हद्दीतून हे धंदे समुळ नाहीसे करण्याचा मानस असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुन्हे शाखा युनिट ५ ची धडक कारवाई, पुण्यात पिस्टल विक्री करणारे व खरेदीदार जेरबंद

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  गुन्हे शाखा युनिट ५ ची धडक कारवाई, पुण्यात पिस्टल विक्री करणारे व खरेदीदार जेरबंद आपण पाहत आहात क्राईम न्यूज...   मार्शल...

निवडणूक मतमोजणीवेळी शांतता भंग, १९ बुलेटसह दुचाकी जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  निवडणूक मतमोजणीवेळी शांतता भंग, १९ बुलेटसह दुचाकी जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- मतमोजणीदरम्यान ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट...

पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे शहरात वाहतूक बदल, काही रस्ते बंद

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे शहरात वाहतूक बदल, काही रस्ते बंद   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- पुणे शहरातील नागरिकांसाठी...

ऑनलाईन फसवणूक आणि रस्त्यावर दहशत, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  ऑनलाईन फसवणूक आणि रस्त्यावर दहशत, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा आपण पाहत आहात क्राईम न्यूज... मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- दिनांक,...

रांजणगावात पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; २०३ किलो गांजा मिश्रित “बंटा” गोळ्या जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  रांजणगावात पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; २०३ किलो गांजा मिश्रित “बंटा” गोळ्या जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:-...

error: Content is protected !!