जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
लोणी काळभोरमध्ये मोठी घरफोडी. तब्बल १ लाख ६४ हजार रुपयांचे ऐवज लंपास…
लोणी काळभोर परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी मोठा हात मारला आहे. कदमवाक वस्तीत प्रथमेश अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये घरफोडी करून तब्बल एक लाख ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
फिर्यादी मंगेश तुकाराम मोहिते, वय २९ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० सप्टेंबरच्या सायंकाळी सहा वाजल्यापासून ते २२ सप्टेंबरच्या सकाळी सहा वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्याने फ्लॅट क्रमांक एकशे दोन मधील दरवाजाचे व कपाटाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरातून सोन्याचा नेकलेस, अंगठी, नथ, कानातले, चांदीचे दागिने आणि तब्बल ३० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख ६४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे आणि गुन्हे शाखेच्या स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, सहायक निरीक्षक सोमनाथ नाळे व उपनिरीक्षक योगेश पैठणे करीत आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























