जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
लोणी काळभोर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई… पाच जण अटकेत.
लोणी काळभोर पोलिसांनी पांढरे मळा कांबळे यांच्या शेतामध्ये छापा टाकून जुगार खेळणाऱ्या टोळीला पकडलं आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ ‘अ’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई योगेश हरिभाऊ उदमले यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी, सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी, लोणी काळभोर येथील पांढरी माळा परिसरात लक्ष्मण महादेव शिंदे, प्रवीण यशवंत काळे, अजीमुद्दीन शेख, सुनील काळभोर आणि गणेश केसकर हे सर्वजण पैशावर “रमी पत्ते” नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या वेळी पोलिसांनी ताब्यात घेतला मुद्देमाल ३०० रुपये रोख रक्कम, १०४ पत्त्यांचा कॅट आणि पत्त्याचं कव्हर.
सर्व आरोपींविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, हवालदार नळे आणि हवालदार कोल्हे यांच्या पथकाने केली.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























