जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
रात्रगस्त दरम्यान लोणंद पोलीस स्टेशनची दमदार कारवाई
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाइन:- पुणे : लोणंद येथे शास्त्री चौक येथे रात्रगस्त करताना लोणंद पोलिसांनी रोहीत ओमप्रकाश विश्वकर्मा वय २३ रा. लोणंद ता. खंडाळा यास टमटम मध्ये चोरीचा डिस्कसह टायर असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाताना पकडले असून त्याच्यावर लोणंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहीती अशी की लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशिल भोसले यांनी विभागीय रात्रगस्त ही सतर्कपणे करणेबाबत सुचना दिल्या होत्या. विभागीय रात्रगस्त करत असताना दिनांक ११/२/२०२५ रोजीचे पहाटे ०३:०० वाजताचे सुमारास लोणंद ता. खंडाळा गावचे हददीत शास्त्री चौक येथे एक संशईत महींद्रा कंपनीची जिते टमटम क्रमांक एम.एच.११.सी. एच. ४६२८ ही पाठीमागे हौदयामध्ये नवीन
टायर भरुन जाताना दिसुन आली. तिचा पाठलाग करुन टमटम थांबवले असता चालक रोहीत ओमप्रकाश विश्वकर्मा वय २३ रा. लोणंद ता. खंडाळा जि. सातारा हा त्यामध्ये मिळुन आला. त्यावेळी त्यास गाडीमध्ये असलेले टायर याबाबत माहीती विचारली असता त्याने असमाधानकारक माहीती देवून उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत. त्याचे ताब्यात 1 लाख रुपये किंमतीचा महींद्रा कंपनीची जिते टमटम क्रमांक एम.एच.११.सी.एच. ४६२३ ही त्यात २ लाख ३० हजार रुपये किंमतीचे डिस्क असलेल्या टायर व ४२ हजार रुपये किमतीचे टायर असा चोरी केलेला मुददेमाल मिळुन आला आहे. त्याबाबत लोणंद पोलीस स्टेशनचे पोकॉ. शेखर शिंगाडे यांनी फि्याद दिली असुन गुन्हयाचा तपास पोहवा सर्जेराव सुळ हे करीत आहेत
सदरची कारवाई लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशिल बी. भोसले , पोउन विशाल कदम, देवेंद्र पाडवी, सर्जराव सुळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, विठठल काळे, रमेश वळवी, केतन लाळगे, अंकुश कोळेकर, सतीष दडस,
जयवंत यादव, संजय चव्हाण, होमगार्ड रविंद्र व्हटकर, दत्तात्रय येळे, अमर शेळके यांनी कारवाईत सहभाग घेतला
फोटो ओळ -जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख