जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्यास मारहान केलेल्या नराधमांना लोणंद पोलीसांनी केले जेलबंद
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाईन:- लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी आयटीआय कॉलेज मधुन ५ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास जिंती येथे घरी जात असताना अल्पवयीन मुलाचे अज्ञात पाच इसमांनी अपहरण करुन त्यास घेवुन गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
सदर घटनेत राकेश ऊर्फ मोन्या रमेश जाधव (वय २९ वर्षे राहणार सातसर्कल साखरवाडी ता. फलटण), अशुतोष ऊर्फ बटया संतोष जाधव (वय २१ वर्षे राहणार सातसर्कल साखरवाडी तालुका फलटण) प्रविण किसन मोहिते (वय २७ वर्षे राहणार साखरवाडी तालुका फलटण) सिध्दांत यशवंत बनसोडे (वय १९ वर्षे राहणार साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून अजय शशिकांत सपकाळ (रा. साखरवाडी ता. फलटण) हा आरोपी फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसाना माहिती मिळाली की माघील काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमा दरम्यान अपहरण झालेल्या मुलासोबत साखरवाडी येथील काही मुलांचा वाद झाला होता. त्यावेळी त्या मुलांनी त्यास उचलुन नेण्याची धमकी दिली होती. दरम्यान काळज येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन पुढे तडवळे रोडने खराडेवाडी, साखरवाडी रोडने होळ ता. बारामती येथे नेल्याची व त्यास मारहान केली असल्याची लोकांचेकडुन माहीती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने
बजरंगवाडी ता बारामती येथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले त्यावेळी बजरंगवाडी तालुका बारामती येथील फुटेज पाहात असताना दोन्ही मोटार सायकलवरुन फक्त पाच इसम दिसले त्यावरुन पोलिसांची खात्री झाली की आरोपींनी पोलीस पाठलागावर असल्याचा संशय आल्याने अल्पवयीन मुलांस खुंटे ते जिंती ता. फलटण रोडवर परीसरात सोडुन तेथुन पोबारा करुन पळुन गेले आहेत.
दरम्यान अपहरण झालेल्या मुलाच्या वडीलांनी याठिकाणी जावुन पाहीले त्यावेळी मुलगा बेशुध्द अवस्थेत होता म्हणुन त्यास उपजिल्हा रुग्णालयात फलटण व त्यानंतर बारामती येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी घेवुन गेले आहेत.
आरोपीचा शोध घेण्यासाठी लोणंद पोलीसस्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. सदर सर्व पथकांने गोपणिय माहीतीचे आधारे गुन्हयातील चार आरोपी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घुले हे करीत आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख