जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
कोंढव्यातील मौर्य सोसायटीसमोर पहाटे नकली पिस्तुल डोक्याला लावुन तरुणाला लुटणाऱ्या 2 गुन्हेगारांना केले अटक…
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- हॉटेलमधील काम संपवून पहाटे घरी जाणाऱ्या एका शेफच्या डोक्याला नकली पिस्तुल लावून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
तबरेज ऊर्फ परवेज मुनीर शेख (रा. जे के पार्क, कोंढवा) आणि रमजान अब्बास पटेल (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मोहम्मद यासीन निहार मन्सुरी (वय २२, रा. एचडीएफसी बँकेजवळ, साळुंके विहार रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मौर्य सोसायटीच्या समोरील डांबरी रोडवर १५ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद मन्सुरी हे हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतात. काम संपवून ते घरी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्याच्या डोक्याला पिस्तुल लावून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेला. माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी परिसरातील व्ही फुटेज तपासले. त्यात हे दोघे कैद झाले होते. त्यावरुन पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी कोंढवा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे तपास करीत आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख