जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
टिंबर मार्केटहून चोरी गेलेला आयशर ट्रक पोलिसांनी वसूल केला…
खडक पोलीस ठाण्याच्या दक्ष पथकाने सराईत वाहनचोरांच्या टोळीला अटक करून वाहन चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले असून १ ट्रक, १ कार आणि ३ दुचाकी अशी एकूण सुमारे तीन लाख रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत केली आहे.
फिर्यादी हे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असून त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांचा आयशर ट्रक क्रमांक, MH 14 CP 56पचपन्न हा टिंबर मार्केट, पुणे येथे उभा केला होता. दिनांक ३ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अज्ञात चोरट्याने हा ट्रक चोरून नेल्याची तक्रार खडक पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे, ४७, २५, बीएनएस, कलम तीनशे, ३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार आणि मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अर्जुन कुदळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींचा माग काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारे बीड अहिल्यानगर परिसरात शोध मोहिम राबवून श्रीगोंदा जामखेड रोडलगतच्या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. तेथून आरोपी तुषार संजय झांबरे (वय २९, राहणार बीड) याला चोरीस गेलेल्या ट्रकसह ताब्यात घेण्यात आले. त्याचा साथीदार आरोपी शाहरुख राजू पठाण (वय २८, राहणार लोणी काळभोर, पुणे) हा तेथून पसार झाला होता.
नंतर शाहरुख पठाणचा वेगन आर कारसह पुण्यात शोध घेऊन त्याला शिताफीने अटक करण्यात आली. त्याच्या कारमधून DR, Shaharukh Pathan, BJGMC Sassoon Hospital अशा नावाची नेमप्लेट, ससून रुग्णालयाचा शिक्का असलेला डॉक्टरांचा ॲप्रन, शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे हिरवे ॲप्रन, स्टेथोस्कोप तसेच इन्स्टाग्रामवर डॉक्टरच्या वेशातील त्याचे फोटो आढळून आले. तो स्वतःला डॉक्टर म्हणून खोटा आव आणत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तपासादरम्यान खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले.
खडक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे, ४७, २५ आयशर ट्रक MH 14 CP 56, पचपन्न, किंमत सुमारे २, पन्नास हजार रुपये
फरासखाना, समर्थ, लोणावळा शहर, सांगवी व विश्रांतवाडी पोलीस ठाण्यांतील ॲक्टिव्हा दुचाकी चोरीचे एकूण ५ गुन्हे
तपासात आरोपी तुषार झांबरे याच्यावर याआधीही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे नोंद असल्याचे, तर आरोपी शाहरुख पठाण याच्यावर दुचाकी व चारचाकी चोरीचे तब्बल ३१ गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























