जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
कार चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने, पायी चाललेल्या मुलीला चिरडले, मुलीचा जागीच मृत्यू.
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन:- पुण्यात कात्रज भागात, सुखसागरनगर भागातील, यशश्री सोसायटी समोरून पैदल चाललेल्या, मुलीला भरधाव कारने चिरडल्याची, धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना दिनांक १३ जुन २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली असून, रस्त्यावरुन चालणाऱ्या या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
सतीश गुरुनाथ होनमाने, वय ३७ वर्ष राहणार, गोकुळनगर असे अटक केलेल्या मोटार चालकाचे नाव असून, श्रेया गौतम येवले, वय २१ राहणार, शीतल हाईट्स, खंडोबा मंदिराजवळ कोंढवा, असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने, हा अपघात घडला आहे, मोटार मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसून, एका नाराळाच्या झाडाला तोडून मुलीला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, समोर असणारे बदामाचे झाड आणि मोटारीच्या मध्ये, सापडून मुलीचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ, बिबवेवाडी व कोंढवा पोलीस ठाण्याचे, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेत ससून येथे, शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख