जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
कराड पोलिसांची मोठी कारवाई; १२ जणांची ड्रग्ज विक्री करणारी टोळी जेरबंद
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- सातारा कराड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल १२ जणांची ड्रग्ज विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात सातारा पोलिसांना यश आलंय. यात दोन परदेशी व्यक्तींचा देखील समावेश आहे.
कराड परिसरात ड्रग्ज विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुंबईपर्यंतचं ड्रग्ज रॅकेटच शोधून काढून या आरोपींना अटक केली आहे.
या आरोपींकडून एक लाख १४ हजार रुपयांचे ३७ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज जप्त केले आहे. हे सर्व रॅकेट हे बसेसमधून चालवले जात असायचे. बस ड्रायव्हरकडे पाकिटातून, मिठाईच्या डब्यातून हे ड्रग्ज एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात असायचे अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख