जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
काळेपडळ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी
पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत तब्बल ४ लाख ५७ हजार रुपयांची चोरी गेलेली वाहने जप्त केली आहेत. यामध्ये ५ दुचाकी आणि १ रिक्षाचा समावेश असून, आरोपी मोहम्मद नजीम जमील सलमानी याला अटक करण्यात आली आहे. आरोपी उत्तरप्रदेशातील लखनौचा मूळ रहिवासी असून, सध्या पुण्यात हडपसर परिसरात राहत होता.
काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक २३७/२०२५ या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार शाहीद शेख आणि महादेव शिंदे यांनी त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. तपासादरम्यान आरोपीकडून चोरीची कबुली मिळाली असून, त्याच्याकडून प्लॅटीना, पॅशन प्लस, सिबी ट्रिगर, ॲक्टीव्हा आणि रिक्षा अशा विविध प्रकारच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस उप आयुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या नेतृत्वाखालील पथकात हवालदार प्रविण काळभोर, अंमलदार दाऊद सय्यद, शाहीद शेख, महादेव शिंदे आदींचा समावेश होता. त्यांच्या प्रशंसनीय कार्यामुळे तब्बल सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख