जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
रस्त्यामध्ये आडवणुक करुन मारहाण करणारे व बळजबरीने लुटमार करणारे, दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन त्यांचे ताब्यातुन रिक्षा, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण १,२०,४०० /- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.
काळेपडळ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाईन:- पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर, यांनी चालु केलेल्या मोहिम अंतर्गत, सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवुन, त्यांचे बेकायदेशीर कृत्यास तात्काळ प्रतिबंध करुन, त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करुन, गुन्हेगारी समुळ नष्ट करुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत करण्यात आलेले आहे. काळेपडळ येथील सासवड रोड रेल्वे स्टेशन व आजुबाजुच्या परीसरात रात्रीच्या वेळी रेल्वेने सासवड रोड, रेल्वे स्टेशन तसेच काळेपडळ हद्दीत कामगार वर्ग असल्याने फिर्यादी व साक्षीदार हे कामावरुन, घरी येता जाता त्यांना अडवणुक करुन बळजबरीने व जबरदस्तीने मारहाण, करुन जीवे मारण्याची धमकी देवुन जबर जखमी करुन खिशातून पैसे तसेच मोबाईल हॅडसेट सारखे किंमती वस्तु काढुन घेवुन, पळुन गेलेनें त्यांच्याविरुध्द काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर २०६ / २०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (६) ११८ (२) ३५२, अन्वये अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील पाहीजे फरार आरोपींचा शोध घेत असताना तपासी अधिकारी पोलीस उप निरिक्षक विनायक गुरव व पोलीस हवलदार संजय बागल, तपास पथक पोलीस हवलदार प्रवीण काळभोर, पोलीस हवलदार दाऊद सय्यद, पोलीस हवलदार प्रतिक लाहीगुडे, पोलीस अमंलदार शाहीद शेख, पोलीस अमंलदार सद्दाम तांबोळी व पोलीस अमंलदार अतुल पंधरकर यांनी नमुद दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपींबाबत अत्यंत चिकाटीने माहीती काढली असता सदर आरोपींचे, ठावठिकाण्याबाबत गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळवली. त्याप्रमाणे नमुद आरोपीत हे ग्लायडींग सेटर हडपसर पुणे, मधील मोकळे मैदानातील झुडपामध्ये लपुन बसलेले असताना त्यांना दिनांक ०३/०६/२०२५ रोजी ताब्यात घेवुन काळेपडळ पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचेकडे अत्यंत शिताफीने तपास करता, त्यांनी दाखल गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार यांचे यांच्या खिशातुन बळजबरीने व जबरदस्तीने काढुन घेतलेला, ओप्पो कंपनीचे मोबाईल हँडसेट व रोख रक्कम तसेच आरोपी इसम यांनी, गुन्हयात वापरलेली ऑटो रिक्षा असा एकुण १,२०,४००/- रुपये किंमीचा माल व रोख रक्कम हस्तगत करुन नमुदचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कारवाई ही श्री राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ पाच पुणे शहर, धन्यकुमार गोडसे, सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व मानसिंग पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक व अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक, अमीत शेटे, पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव, पोलीस अंमलदार संजय बागल, प्रविण काळभोर, प्रतीक लाहीगुडे, शाहीद शेख, दाऊद सय्यद, सद्दाम तांबोळी व अतुल पंधरकर या विशेष पथकाने केली आहे.
सदर गुन्हयाचा अधिक तपास हे पोलीस उपनिरिक्षक विनायक गुरव हे स्वता : करीत आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख