जाहिराती व बातमीसाठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
मेट्रोमनी साईटवरुन महिलांशी मैत्री करुन, फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार यास इंदोर मध्यप्रदेश येथुन काळेपडळ पोलीसांकडुन अटक
काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- काळेपडळ पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर १९१९/२०२४ भा.द.वि. कलम
३७६,३७६(२) (एन) ४२० मधील महिला
फिर्यादी यांचे सोबत आरोपी नामे अमन प्रेमलाल वर्मा वय ३८ वर्षे, रा. वॉर्ड नं. ८हाउस नं. ५२ विश्ना जि. जम्मू काश्मिर याने संगम डॉट कॉम मेट्रोमनी साईट वरुन संपर्क साधुन, फिर्यादीस लग्नाचे खोटे अश्वासन देवुन, फिर्यादी सोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करुन, त्यांचा विश्वास संपादन करुन, फिर्यादी कडुन ऑनलाईन व रोख स्वरुपात सुमारे ४५ लाख रुपये घेवुन, फिर्यादी सोबत लग्न न करता त्यांची आर्थिक फसवणुक केले बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयाचे तपासात पाहिजे आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन, तो सोशल मिडीयावर अथवा मेट्रोमनी साईटवर फेक आयडी तयार करुन, महिलांशी मैत्री व जवळीक निर्माण करुन, आपले जाळयात फसवुन, त्यांना लग्नाचे अमिष दाखवुन शारीरीक संबंध ठेवुन, त्याना ब्लॅकमेल करुन, त्यांचेकडुन ऑनलाईन व रोख स्वरुपात रक्कम घेवुन फसवणुक करत असलेबाबत निष्पन्न झाले व सदर आरोपी विरुध्द दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदोर या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सदर गुन्हयाचे तपासात गुप्त बातमीदार यांचेकडुन गुन्हयातील पाहिजे आरोपी हा इंदोर मध्यप्रदेश येथे येणार असल्याची बातमी प्राप्त झाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करुन, वरिष्ठांचे पुर्व परवानगी घेवुन, काळेपडळ पोलीस ठाणेकडील तपास पथक इंदोर येथे जावुन, स्थानिक पोलीस मदतीने व तांत्रिक तपसावरुन आरोपी अमन प्रेमलाल वर्मा यास शिताफीने ताब्यात घेवुन, काळेपडळ पोलीस ठाणे येथे आणुन, गुन्हयाचे तपासकामी अटक करुन मा. न्यायालयात रिमांड कामी हजर केले असुन, त्यास दिनांक १०/०२/२०२५ रोजी पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असुन, सदर गुन्ह्याचा पुढील तपास विलास सुतार, सहा. पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त. पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. राजकुमार शिंदे यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त. वानवडी विभाग पुणे श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. मानसिंग पाटील, यांचे सुचने प्रमाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार, पोलीस हवालदार युवराज दुधाळ, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले यांचे पथकाने केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख