Homeक्राईमएम.आय.डी.सी. पोलीसांनी आरोपीकडुन जप्त केल्या दोन बुलेट मोटार सायकली

एम.आय.डी.सी. पोलीसांनी आरोपीकडुन जप्त केल्या दोन बुलेट मोटार सायकली

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

एम.आय.डी.सी. पोलीसांनी आरोपीकडुन जप्त केल्या दोन बुलेट मोटार सायकली

मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- जळगाव जिल्हयामध्ये मोटार सायकली चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपी अटक करणेबाबत मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना केल्या होत्या.

एमआयडीसी पोलिसात दाखल तक्रारीनुसार हर्षद दिलीपकुमार नाकपाल यांच्या मालकिची रॉयल ईम्पॅक्ट ३५० पांढऱ्या रंगाची बुलेट (क्रमांर एमएच १९, सीएच ४८९८ ) ही त्यांचे राहते घर बाबा नगर सिंधी कॉलनीच्या समोरुन गुरुवार (दि. १३) रोजी रात्री १०.३० वा ते सकाळी ०५.४५ वा चे सुमारास चोरी केली होती. सदर बाबतीत फिर्यादी यांनी बुलेट मोसा चोरी गेल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन ला फिर्याद दिल्यावरुन गुन्हा रजि. नंबर ८४४ / २०२४ बीएनएस कलम ३०३ (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोधपथकातील तपासी अंमलदार पोना किशोर पाटील यांनी सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासुन गुन्हा उघडकिस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या, त्यानुसार गुन्हे शोधपथकातील पोना. योगेश बारी, विकास सातदीवे, पोका नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांनी सतत पाठपुरावा करुन गोपणीय बातमीच्या आधारे संशईत, 1 ) जावेद शेख चांद, रा मास्टर कॉलनी जळगाव 2) अदनान अमजद खान रा शाहुनगर जळगाव यांना ताब्यात घेवुन दिनांक 22/02/2025 रोजी अटक करुन मा. न्यायालय समक्ष पोलीस कस्टडी रीमांड करीता हजर करुन दिनांक 24/02/2025 पर्यंत पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडीत असतांना दोन्ही संशईतांनी रॉयल ईम्पॅक्ट 350 पांढ-या रंगाची बुलेट क्र. MH-19 CH-4898 ही सिंधी कॉलनी बाबा नगर येथून चोरी केल्याची कबुली दिली. अजुन काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता दिसुन आल्याने आरोपी जावेद शेख चांद याची पुन्हा 02 दिवस वाढीव

पोलीस कस्टडी रीमांड घेतली. रीमांड दरम्यान त्याने पुन्हा एक काळया रंगाची बुलेट ही मास्टर कॉलनी परीसरातुन चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर बुलेट सुध्दा त्याचे कडुन हस्तगत करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एकुण 1,30,000/-रुपये किंमतीच्या दोन बुलेट मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, पोना. योगेश बारी, विकास सातदीवे, पोका नितीन ठाकुर, नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास किशोर पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू... मार्शल मिडिया न्युज:- पुणे ऑनलाईन:- बारामती : दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री...

खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान प्रतिनिधी:- सातारा ब्युरो चिफ दिलीप वाघमारे मार्शल मीडिया न्यूज:- पुणे...

Vivo X300 Pro पुनरावलोकन: फ्लॅगशिप मोबाइल फोटोग्राफी. पुन्हा परिभाषित.

Vivo X300 Pro हा कॅमेरा उत्साही लोकांसाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे आणि तो टेलीफोटो एक्स्टेंडर किटला देखील सपोर्ट करतो, जो मागील वर्षापर्यंत अल्ट्रा मॉडेलसाठी...

उरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी...

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ उरुळी कांचन मध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी मोहीम. उरुळी कांचन :...

सोमाटणे टोलनाक्यावर हवालदार राठोडच्या शौर्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले, प्रचंड मुद्देमाल जप्त…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ सोमाटणे टोलनाक्यावर हवालदार राठोडच्या शौर्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले, प्रचंड मुद्देमाल जप्त... पिंपरी-चिंचवडमधील सोमाटणे टोल नाक्यावर आज पहाटे सिनेमात शोभेल...

error: Content is protected !!