जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
हिंजवडी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी ! उच्च शिक्षित इंजिनियरला लॅपटॉप व मोबाईल चोरिच्या गुन्ह्यात ठोकल्या बेड्या…
हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे हिंजवडी पोलीस ठाणे येथे मुकाईनगर येथील पी. जी. मधुन १ लॅपटॉप व १ मोबाईल फोन चोरी झालेबाबत हिंजवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ८९/२०२५ भा. न्याय संहिता कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असता पोलीस ठाणे हद्दीत पी. जी. मधुन मोबाईल व लॅपटॉप चोरी होत असल्याने कन्हैया थोरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरच्या गुन्हयांना आळा घालुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या. दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना हिंजवडी पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार कारभारी पालवे व ओम कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारमार्फत सदरचा गुन्हा हा साखरेवस्ती हिंजवडी पुणे येथील पी. जी. मध्ये राहणाऱ्या मुलाने केला आहे. त्यावेळी तपास पथकातचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, सपोफी नरेश बलसाने, पो.शि. २२८४ कारभारी पालवे, पो.शि. २४०१ ओम कांबळे पो.शि. २२८४ रवि पवार व पो.शि. २६३३ विशाल भोईर यांना हिराई सिताई मंदीराजवळ पारखेवस्ती, साखरेवस्ती, हिंजवडी पुणे येथे सापळा लावुन थांबले असता बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचा एक इसम स्काय लाईन नावाचे पी. जी. मधुन बाहेर येताना दिसला त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव व पत्ता निखील वसंत खाडे वय २९ वर्षे मुळ रा. मु. राजगुरुनगर पो. पुसद ता. पुसद जि. यवतमाळ सध्या रा. स्काय लाईन पी. जी. हिराई सिताई मंदीराजवळ साखरेवस्ती, हिंजवडी पुणे. असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याचे खिशात गुन्हयातील चोरीस गेलेला वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला. त्यानंतर त्यास दाखल गुन्हयात अटक करुन तपासाअंती त्याचेकडुन एकुण २,५०,०००/- रुपये किंमतीचे २ लॅपटॉप व १० महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास नरेश बलसाने सपोफी हिंजवडी पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. शशीकांत महावरकर साो, सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी साो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. विशाल गायकवाड सो पोलीस उप आयुक्त परि २ पिंपरी चिंचवड, मा. श्री. सुनिल कुन्हाडे सो सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैन्हया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषीकेश घाडगे तपास पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे पोलीस अंमलदार नरेश बलसाने, योगेश शिंदे, कैलास केंगले, प्रशांत गिलबिले, विजय गेंगजे, कारभारी पालवे, रवि पवार, विशाल भोईर, ओमप्रकाश कांबळे व मंगेश लोखंडे यांनी केली.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख