जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
हडपसर येथील घर फोडून ४८ तोळे सोने चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या.
मार्शल मीडिया न्यूज पुणे: ऑनलाईन:- हडपसर मधील एका नामांकित सोसायटी मधील फ्लॅट फोडून ४८ तोळे सोने चांदीसह तिजोरी चोरून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाला अटक करण्यात यश आले आहे. घरफोडीनंतर पळून जाण्यासाठी आरोपीने चोरीची आणि नंबर नसलेली दुचाकी वापर केला होता. मात्र पदकाने सलग २३ दिवस पुण्यासह बारशी सोलापूर धाराशीव परांडा भागात तपास करून आरोपीचा माग काढत त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रोहित विलास अंधारे वय वर्ष २५ राहणार भांडगाव तालुका परंडा धाराशव सध्या राहणार कराडी असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंधारे हा एका खाजगी रुग्णालयात एक्सरे टेक्निशियन म्हणून नोकरी करत होता. मात्र व्यसनाधीन व कर्जबाजारी झाल्याने त्यानी हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. १८ मे रोजी हडपसर परिसरातील एक फ्लॅट मधून ४८ तोळे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला केला होता.
हा गुन्हा नोंदविल्यानंतर गुन्हे शाखेच्या पदकाकडून तपास सुरू होता. यादरम्यान पोलिसांना नंबर नसलेली संशयत दुचाकी मिळाली या दुचाकीचा वापर करून आरोपीने घर फोडी केल्याचे सीसीटीव्हीतून समोर आले त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला जवळपास १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली तसेच धाराशिव भूम सोलापूर सह विविध भागात शोध मोहीम राबवली गुन्हे शाखेच्या पदकाने सलग २३ दिवस तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे तपास करून आरोपीला मांजरी भागातून ताब्यात घेतले त्याच्याकडून ४८ तोळे सोने डायमंडचे दागिने ने चांदी आणि तुचाकी जप्त केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख