जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
शेवाळवाडी येथील स्पा वर कारवाई ७ तरुणींची सुटका तर मालक, मॅनेजरवर गुन्हा दाखल
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन:- शेवाळवाडी येथील लक्झरीयस स्पा येथे मसाज पार्लर च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून १३ मे रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली आहे.
तर स्पा चालक लोकेश कोल्हे (रा. हडपसर) आणि मॅनेजर अनिकेत इंद्रजित कोंडारे (वय ३१, रा. शिंदे वस्ती, केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहे.
तर सदर घटनेत ७ तरुणींची सुटका करण्यात आली असून याबाबत पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर हडपसर पोलिसांनी शेवाळवाडी येथील लक्झरीयस स्पा येथे मसाजच्या नावावर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठविला. या ग्राहकाने खात्री करुन इशारा केल्यावर पोलिसांनी छापा टाकला. तेथे ७ तरुणी आढळून आल्या. स्पाचालक लोकेश कोल्हे हा मॅनेजर अनिकेत कोंडारे याच्या मार्फत तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतल्याचे आढळून आले.
पोलिसांनी या तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिलागृहात रवानगी केली आहे. पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख