जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
हडपसर पोलिसांची धमाकेदार कामगिरी…
स्कुलबस चालकाकडून टेम्पो चालकाला मारहाण व वाहनाचे नुकसान. हडपसर पोलिसांनी सुरज पाटलांची उतरवली झिंग…
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन :- दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी, दुपारी साधारण तीन वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा ब्रिज परिसरात स्कुल बस क्रमांक एमएच चौदा एमएम नऊ आठ तीन सात हा वाहनचालक बेधडकपणे बस चालवत होता. त्या दरम्यान बस चालकाने टेम्पो क्रमांक एमएच चौदा के ए आय शून्य नऊ एक शून्य या वाहनाच्या चालकाला अडवून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. इतक्यावरच थांबत न राहता बसमधील लोखंडी रॉडने टेम्पोच्या समोरील काच फोडून नुकसान केले आणि सार्वजनिक रस्त्यावर दहशत निर्माण केली.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी क्राईम नंबर आठशे चौऱ्याहत्तरीनुसार बीएनएस कलम दोनशे एक्याऐंशी, तीनशे एकावन्न उपकलम दोन, तीनशे बावन्न, तीनशे चोवीस उपकलम दोन, सत्तेचाळीस उपकलम एक, एकशे पस्तीस, तीन आणि पाच प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणातील आरोपी सुरज रमेश पाटील, वय बत्तीस, व्यवसाय चालक, राहणार. पिंपरी चिंचवड पुणे यास पोलिसांनी तात्काळ चिंचवड येथून शिताफीने ताब्यात घेतले. घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला असून, टेम्पो चालकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई आरोपीकडून तातडीने करून घेण्यात आली आहे.
हडपसर पोलिसांचा तपास सुरू आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























