जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटातील फरार आरोपीला जेरबंद करत १ पिस्तूल व २ काडतुसे जप्त
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन:- पुण्यात शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४० हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ओंकार सचिन मोरे (वय २३, राहणार. मुठा कॉलनी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी पोलीस ठाण्यात शरद मोहोळ खून प्रकरणात बदला घेण्यासाठी कट रचल्याचा गुन्हा दाखल होता.
या प्रकरणात मोरे हा फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (१९ मे) गस्त दरम्यान मोरे याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सुतारदरा (कोथरूड) परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ४० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओमकार कुंभार, हनुमंत काबंळे, अमोल सरडे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण व नागेश राख यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख