जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
शेंडी व वांजोळी परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- अहिल्यानगर मध्ये, वांजोळी (ता. नेवासा) या परिसरात रात्रीच्यावेळी दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ५८ हजार रुपायांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तुषार सावंत भोसले (वय २७, रा.पिंपळगाव कौडा, ता. अहिल्यानगर), विकी संजय काळे ( वय १८, रा. भोरवाडी, ता. अहिल्यानगर), सुशांत सुरेश भोसले (वय १९, रा.पिंपळगाव कौडा, ता. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार शेंडी येथील कजबे वस्तीवर रात्रीच्या वेळी तुषार भोसले याने त्याच्या साथीदारांसह दरोडा टाकला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तसेच त्याचा साथीदार विकी काळे हा भोरवाडी परिसरात आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे तीन पथके रवाना केली. या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा पाठलाग केला. मात्र, पोलीस पथकावर आरोपीने दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी चोरीचे दागिने सोनार विनोद लक्ष्मण बुऱ्हाडे (रा. बुऱ्हानगर, ता. अहिल्यानगर) यास विकल्याचे समोर आले. पथकाने पंचासमक्ष सोनाराकडून ३० ग्रॅम वजनाचे २ लाख ५८ हजार रुपयांचे दागिने पंचासमक्ष हस्तगत केले.
ताब्यात घेतल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता अविनाश सावत्या भोसले, रमेश सावत्या भोसले (दोन्ही रा . पिंपळगाव कौडा, ता. अहिल्यानगर), अभिजीत किरण भोसले, तपेश किरण भोसले, वैभव किरण भोसले (सर्व पसारा) (सर्व रा.धानोरा, ता. आष्टी, जि. बीड) यांनी केला असल्याचे सांगितले. तसेच नेवासा तालुक्यातील वांजोळी शिवारात १० ते ११ दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी एका वस्तीवर दरोडा टाकल्याचे तपासत पुढे आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे तुषार धाकराव, अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, बापुसाहेब फोलाणे, हृदय घोडके, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, राहुल सोळंके, पंकज व्यवहारे, सोमनाथ झांबरे, शाहीद शेख, गणेश धोत्रे, अशोक लिपणे, विजय ठोंबरे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, विशाल तनपुरे, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, रोहित येमुल, अमोल कोतकर, रोहित मिसाळ, अमृत आढाव, मनोज लातुरकर, सुनिल मालनकर, रमिजराजा आत्तार, भगवान थोरात, उमाकांत गावडे, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर व महादेव लगड यांच्या पथकाने केली.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख