जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
खुनाचे गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेवुन गुन्हे शाखेने लातुर येथुन केले जेरबंद.
मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन:- फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत अनोळखी इसमाचा मृतदेह मिळुन आला होता. मयताचे डोक्यात व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेली होती. मयताची ओळख पटवली असता त्याचे नाव हनिफ मुसा शेख, वय ३० वर्षे, रा. कृष्णानगर, महमदवाडी, पुणे असे असल्याचे समजले.
सदर बाबत फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे दिनांक १०/०५/२०२५ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ९२/२०२५. भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. वरिष्ठांचे आदेशान्वये सदरबाबत गुन्हे शाखा युनिट पाच व सहा येथे गुन्हयाचा समांतर तपास सुरू होता.
वेगवेगळी पथके तयार करून अहोरात्र तीन दिवस तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण तसेच ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सदरचा गुन्हा हा आरोपी नामे आसिफ युनूस शेख वय २५ वर्षे राहणार गल्ली नंबर पाच सय्यदनगर हडपसर पुणे याने केला आहे.
व तो गुन्हा घडल्यानंतर त्याचे मूळ गाव शास्त्रीनगर लातूर येथे गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने दिनांक १३/०५/२०२५ रोजी सदर ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस हवलदार प्रताप गायकवाड, पोलीस अंमलदार अकबर शेख यांना रवाना केले होते.
सदर आरोपीतास शास्त्रीनगर लातूर येथुन ताब्यात घेवुन गुन्हे शाखा युनिट पाच कार्यालय पुणे येथे आणुन सखोल तपास करता आरोपीताने जुने वादाचे कारणावरून मयताचे डोक्यात दगड घालुन खुन केला असल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपीतास पुढील तपासकामी फुरसुंगी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे. पोलीस. हवलदार बाळासाहेब सकटे. कानिफनाथ कारखेले. सुहास तांबेकर, पोलीस अंमलदार शेखर काटे. गणेश डोंगरे, नितीन घाडगे गुन्हे शाखा युनिट सहा तसेच सर्व फौज. राजस शेख, पोलीस. हवलदार तानाजी देशमुख. प्रताप गायकवाड. प्रमोद टिळेकर. विनोद शिवले. विनोद निंभोरे. अकबर शेख. अमीत कांबळे. संजय दळवी गुन्हे शाखा युनिट पाच यांनी केली आहे.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख